शिक्षण नोकरीपुरतेच मर्यादित; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खंत

इंग्रजीमुळे तयार झालेली व्यवस्था कधीच भारताच्या मूळ स्वभावाचा भाग नव्हती आणि ती होऊ देखील शकत नाही,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले
Prime Minister Narendra Modi grief Education limited to jobs only Varanasi
Prime Minister Narendra Modi grief Education limited to jobs only VaranasiSakal
Updated on

वाराणसी : ‘‘आमच्या देशामध्ये गुवणत्तेची कमतरता नाही पण दुर्दैवाने आमच्याकडे अशी व्यवस्था तयार झाली जिथे शिक्षणाचा अर्थ केवळ नोकरीपुरताच मर्यादित राहिला. स्वातंत्र्यानंतर देशाच्या शिक्षणविषयक धोरणामध्ये थोडा बदल झाला पण सर्वांत मोठा बदल मागेच राहिला होता. इंग्रजीमुळे तयार झालेली व्यवस्था कधीच भारताच्या मूळ स्वभावाचा भाग नव्हती आणि ती होऊ देखील शकत नाही,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

ते येथे आयोजित तीन दिवसांच्या अखिल भारतीय शिक्षण समागमाच्या उद्‍घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मोदी म्हणाले की, ‘‘राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मुख्य आधार हा शिक्षणाला संकुचित दृष्टिकोनातून बाहेर काढून त्याला २१ व्या शतकातील विचारांशी जोडणे हा आहे. या अमृत काळामध्ये देशाने केलेल्या संकल्पांची पुर्तता करण्याची मोठी जबाबदारी शिक्षण व्यवस्था आणि युवा पिढीवर आहे.’’

प्रकल्पांचे लोकार्पण

मोदींच्या हस्ते आज १,७७४ कोटींच्या विकासप्रकल्पांचा पायाभरणी समारंभ पार पडला. येथील संपूर्णानंद स्टेडियमवर मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रकल्पामध्ये शिक्षण, रस्ते, रेल्वे, महामार्ग आणि पर्यटनक्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.