श्रीनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरचे आले आहेत. यावेळी त्यांनी काश्मीरमध्ये येथील जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, मी याठिकाणी तुमची मनं जिंकण्यासाठी आलो आहे. जोपर्यंत मी तुमची मनं जिंकत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन. ही माझी गँरटी आहे. ((prime minister narendra modi in jammu and kashmir Srinagar first since Article 370 scrapping))
यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत नव्हता. पण, आता विकासाला सुरुवात झाली आहे. काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. उद्देश चांगला असेल तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. जम्मू-काश्मीरमध्ये जी-२० यशस्वीपणे पार पडले. गेल्या काही वर्षांपासून पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विदेशी पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. जम्मू-काश्मीरमधील केसर, सफरचंद यांना खूप महत्त्व आहे, असं मोदी म्हणाले.
जम्मू-काश्मीर हे देशाचं मस्तक आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासाचे प्रयत्न केले जात आहेत. येथे ४० पेक्षा अधिक पर्यटन स्थळ बनवले जाणार आहेत. दोन वंदे भारत ट्रेन धावत आहेत. लोकांसाठी एक नाही तर दोन एम्स हॉस्पिटल निर्माण केले जात आहेत. सात मेडिकल कॉलेज उभारण्यात आलेत. २ कँसर हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरला स्मार्ट बनवण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत, असं मोदी म्हणाले.
जम्मू-काश्मीर आकर्षणाचे केंद्र बनेल. मी माझ्या मन की बात कार्यक्रमात जम्मू आणि काश्मीरबाबत नेहमी बोलत असतो. येथील कला, संस्कृतीचा मी नेहमी उल्लेख करत असतो. जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट असोसिएशनच्या चिन्हामध्ये कमळ आहे आणि आमचे चिन्ह देखील कमळ आहे. त्यामुळे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. क्रिडा क्षेत्राला चालना दिली जात आहे, असं मोदी म्हणाले.
जम्मू-काश्मीर विकासाची उंची गाठत आहे. कारण, जम्मू आणि काश्मीर आज मोकळा श्वास घेत आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू मुक्त झाला आहे. अनेक दशके राजकीय फायद्यासाठी ३७० च्या नावाने जम्मू आणि काश्मीरच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, यापुढे जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त विकास होईल, असं मोदी म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.