काणकोण (गोवा) : ‘‘ऊर्जा क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होत आहे. पारंपरिक स्त्रोतांबरोबरच अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून गोव्याची प्रगती होत असून पर्यावरणाशी सांगड घालून आपल्याला विकास साधायचा आहे,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेतूल येथे केले.
‘भारत ऊर्जा सप्ताह २०२४’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी भारताचा ऊर्जा क्षेत्राशी निगडित दूरदृष्टीकोन उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले, ऊर्जा क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक करण्याचे देशाने ठरविले. त्याचप्रमाणे अन्य देशांतील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
‘भारत ऊर्जा सप्ताह २०२४’ हे गुंतवणूकदार व उद्योजकांना उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ आहे. आजपर्यंत उद्योग क्षेत्रातील नावीन्यपूर्ण शोध फक्त प्रयोगशाळेतच राहत होते. मात्र आता त्याचा खऱ्या अर्थाने त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचत आहे. रस्ते, विमानसेवा, रेल्वे, जल वाहतूक या क्षेत्रांत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिल्याने इंधनाची गरज वाढली.
त्यासाठी पर्यायी पर्यावरणाला पूरक ऊर्जास्त्रोत विकसित करण्यावर सरकार भर देत आहे. भारत शाश्वत विकासावर भर देत आहे. पारंपरिक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घालून वाढत्या ऊर्जा मागणीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. त्यातही यशही येत आहे. जगात हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असताना पाच- सहा वर्षांत ते शून्य टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न आहे.’’
भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करणे
या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे
त्यांच्यात साखळीची रचना करणे
गोव्यात पुढील काही वर्षांत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी जनतेमध्ये जागृती करण्यात येत आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.