वाजपेयींच्या शब्दांसह मोदींची सावरकरांना आदरांजली

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सावरकरांचे वर्णन करताना केलेल्या भाषणाचा ऑडीओ ट्विट केला
Prime Minister Narendra Modi paid homage to  Savarkar
Prime Minister Narendra Modi paid homage to SavarkarSakal
Updated on

नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहताना दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सावरकरांचे वर्णन करताना केलेल्या भाषणाचा ऑडीओ ट्विट केला. भाजपनेही वाजपेयी यांच्या याच ऑडिओसह सावरकरांना आदरांजली वाहिली.‘अभिजात देशभक्त और अद्वितीय स्वतंत्रता सेनानी विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त श्रध्दांजली‘, असे भाजपने म्हटले.

संसदेच्या मध्य कक्षात झालेल्या कार्यक्रमात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, दोन्ही सभागृहांचे महासचिव व अनेक खासदारांनी सावरकरांच्या तैल चित्राला पुष्पांजली वाहिली. वाजपेयी यांच्या कार्यकाळातच माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते सावरकरांच्या या तैलचित्राचे अनावरण झाले होते. दरम्यान महाराष्ट्र सदनात सावरकरांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम अत्यल्प कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. व्यवस्थापिका भागवंती मेश्राम यांनी सावरकरांना अभिवादन केले.

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आदींनीही सावरकरांना अभिवादन केले. मोदी यांनी वाजपेयी यांचे व स्वतःचे सावरकरांबद्दलचे भाषण ट्विट केले. त्यांनी सावरकरांच्या छायाचित्रांचा कोलाज असलेला व्हिडीओही शेअर केला. ‘भारतमातेचे कर्मठ सुपुत्र वीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली अर्पण करतो‘‘ असे मोदी यांनी म्हटले. नायडू यांनी म्हटले ‘‘सामाजिक समरसतेसाठी व अस्पृश्यतेसारखा कलंक मिटविण्यासाठी सावरकरांनी केलेले गंभीर प्रयत्न सदैव आठवणीत रहातील.सावरकरांच्या जीवनाचे नवीन पिढीने अध्ययन करावे.‘‘

शहा यांनीही सावरकरांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा व त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. काळ्या पाण्याची शिक्षा भओगताना त्यांना दिल्या गेलेल्या अमानवीय यातनाही सावरकरांना भारतमातेला वैभवाच्या शिखरावर घेऊन जाण्याच्या त्यांच्या संकल्पापासून परावृत्त करू शकल्या नाहीत, अशा शब्दांत शहा यांनी गौरव केला.

वाजपेयींच्या शब्दांत सावरकर

सावरकर म्हणजे तप, सावरकर म्हणजे तत्व, सावरकर म्हणजे तर्क, सावरकर म्हणजे तारुण्य, सावरकर म्हणजे तीर, सावरकर म्हणजे तलवार, सावरकर म्हणजे तळमळ (सागरा प्राण तळमळला), सावरकर म्हणजे तिखट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.