डेहराडून : गुजरातचा मुख्यमंत्री आणि भाजप संघटनेचा कार्यकर्ता असतानाही उत्तराखंडशी जुळून होतो. मी आता दिल्लीत राहतो, पण उत्तराखंडही हृदयात राहतो. उत्तराखंडशी विशेष नाते असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. उत्तराखंडमध्ये विकासासाठी अनेक योजनांना हिरवी झेंडी दाखवण्यात आली आहे. हे दशक उत्तराखंडचे आहे, असेही मोदी (Narendra Modi) म्हणाले.
यंदाची (Uttarakhand) विधानसभा निवडणूक २०२२ खूप महत्त्वाची आहे. कारण, यानंतरच विकास योजनांना पूर्वीपेक्षा अधिक गती मिळेल. उत्तराखंडमधील कुमाऊंमधील नैनितालसह १४ विधानसभा जागांवर ‘विजय संकल्प सभा’ या आभासी निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या सभेसाठी १० फेब्रुवारी रोजी श्रीनगर, उत्तराखंड येथे येणार आहे, असेही मोदी (Narendra Modi) म्हणाले.
कोरोनाच्या काळात दिल्ली सरकारने परप्रांतीयांना बसमध्ये भरून उत्तराखंडला परत पाठवले होते. ही चिंतेची बाब होती. जनतेवर एवढा मोठा अन्याय केल्यानंतर आता उत्तराखंडमध्ये मत मागायला आल्याचे, नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.
काँग्रेस कधीच विकासाचा विचार करीत नाही. काँग्रेसचे (congress) पहिले काम केवळ एका घराण्याचे, तर दुसरे काम भ्रष्टाचाराचे आहे. काँग्रेसचे तिसरे काम म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण करणे, तर चौथे काम प्रकल्प लटकवणे, जेणेकरून त्याचा गैरफायदा घेऊन आपले खिसे भरता येतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.