पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांची आज सायंकाळी पाच वाजता संवाद साधणार आहेत.
नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी आज सायंकाळी पाच वाजता संवाद साधणार आहेत. त्यामुळे आज ते नक्की काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. आज 1 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना आलेख उतरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी देशाशी संवाद साधण्याची शक्यता आहे. (prime minister narendra modi will address nation today 5 pm)
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी कोरोना मुद्द्यावर बोलण्याची शक्यता आहे. पण, ते नेमकं कोणत्या विषयावर बोलतील याची नक्की माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही. पंतप्रधान मोदी लसीकरण मोहीमेसंबंधी माहिती देऊ शकतात. तसेच कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक आहे. अशात ते यासंदर्भात काही मोठी घोषणा करु शकतात. त्यामुळे त्यांच्या आजच्या बोलण्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल.
रविवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट पाहायला मिळाली. रविवारी देशात एक लाख 636 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील तीन महिन्यातील ही सर्वात कमी कोरोना रुग्णवाढ आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिलेय. मागील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसांतील मृताची संख्याही घटताना दिसत आहे. याच कालावधीत एक लाख 74 हजार 399 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील उपचाराधीन रुग्णसंख्याही घसरली आहे. देशातील उपचाराधीन रुग्णसंख्या 14 लाखांपर्यंत येऊन ठेपली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.