PM Modi's Mother : PM नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

मोदींच्या आई हीराबेन मोदी अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल
PM Modi's Mother
PM Modi's MotherEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती अचानक बिघडल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या आई हीराबेन मोदी यांना 27 डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 27 डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी रस्ता अपघातात जखमी झाल्याची बातमी आली होती.

हिराबेन मोदींनी या वर्षी जूनमध्ये त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले. यानंतर पीएम मोदींनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती.

PM Modi's Mother
Dipali Sayyed : दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना जीवे मारण्याचा कट; माजी PAचा गंभीर आरोप

पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त असल्याने आरोग्याबाबत अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याची सध्याची प्रकृती काय आहे, आणखी त्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. रुग्णालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात जास्त माहिती देण्यात आलेली नाही. फक्त भरतीबद्दल माहिती दिली आहे आणि हिराबेनची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

PM Modi's Mother
Lokayukta Bill: मुख्यमंत्रीदेखील लोकायुक्त कक्षेत असणार; जाणून घ्या काय आहे लोकायुक्त कायदा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.