Narendra Modi : पंतप्रधानांचा कार्यक्रम, अन् मुख्यमंत्री रूसले...; ट्विटरवर काढली समजूत

Narendra Modi
Narendra Modi
Updated on

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच एनडीएच्या बैठकीत तुम्हाला अनेक कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आल्याबद्दल घटक पक्षासमोर दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र आता पंतप्रधानांच्या कार्यक्रमातून थेट मुख्यमंत्र्यांचे भाषण वगळण्यात आलं आहे. तेही काँग्रेसशासित राज्यात हे घडलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावर आक्षेप घेताच पीएमओकडून ट्विटवर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Latest Marathi News)

Narendra Modi
Parliament Monsoon Session : आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू; मोदी सरकार 17 दिवसांत मांडणार 31 विधेयकं

अशोक गेहलोत यांनी ट्विटकरून म्हटलं की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आज तुम्ही राजस्थान दौऱ्यावर आहात. मात्र PMOने कार्यक्रमातून माझे पूर्व नियोजित 3 मिनिटांचे भाषण काढून टाकले आहे. त्यामुळे मी तुमचे भाषणाद्वारे स्वागत करू शकणार नाही. त्यामुळे मी ट्विटद्वारे राजस्थानमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान आज होत असलेल्या 12 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि पायाभरणी हे राजस्थान सरकार आणि केंद्र यांच्यातील भागीदारीचे परिणाम आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रकल्प खर्च 3,689 कोटी रुपये असून, त्यातील 2,213 कोटी रुपये केंद्राचा आणि 1,476 कोटी रुपये राज्य सरकारचे आहे. याबद्दल राज्य सरकारच्या वतीनेही मी सर्वांचे अभिनंदन करतो.

या कार्यक्रमातील माझ्या भाषणातून मी मागण्या करणार होतो, त्या या ट्विटच्या माध्यमातून मांडत आहे. मला आशा आहे की 6 महिन्यांतील 7व्या दौऱ्यात तुम्ही त्या पूर्ण करण्याचे आश्वासन द्याल.

1. राजस्थानच्या विशेषत: शेखावतीच्या तरुणांच्या मागणीनुसार अग्निवीर योजना मागे घेऊन सैन्यात कायमस्वरूपी भरती सुरू ठेवावी.

2. राज्य सरकारने सर्व सहकारी बँकांतील 21 लाख शेतकऱ्यांचे 15,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज माफ करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे वन टाईम सेटलमेंट प्रस्ताव पाठवला असून, त्यात आम्ही शेतकऱ्यांचा वाटा देऊ. ही मागणी मान्य करावी.

3. राजस्थान विधानसभेने जात जनगणनेचा ठराव मंजूर केला आहे. केंद्र सरकारने विलंब न करता याबाबत निर्णय घ्यावा.

4. महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांमुळे आमच्या तीन जिल्ह्यांमध्ये सुरू होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. हे संपूर्णपणे राज्याच्या निधीतून बांधले जात आहेत. केंद्र सरकारनेही या तीन आदिवासीबहुल जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांना ६० टक्के निधी द्यावा.

5. पूर्व राजस्थान कालवा प्रकल्प (ERCP) ला राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा.

मी तुम्हाला विनंती करतो की या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि राज्यातील जनतेला आश्वस्त करावं, असंही गेहलोत यांनी म्हटलं.

यावर पीएमओने म्हटलं की, अशोक गेहलोतजी, प्रोटोकॉलनुसार, तुम्हाला रितसर निमंत्रित केले गेले आहे. तसेच तुमचे भाषण सुद्धा स्लॉट करण्यात आले आहे. परंतु, तुमच्या कार्यालयाने सांगितले की, तुम्ही सहभागी होऊ शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधीच्या भेटीप्रमाणेच तुम्हाला यावेळीही आमंत्रित केले गेले आहे. तुमची कार्यक्रमाला उपस्थिती असल्यास आम्हाला आनंदच होईल. आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुमचे स्वागत आहे. विकासकामांच्या फलकावरही तुमचे नाव आहे.

नुकत्याच झालेल्या दुखापतीनंतर तुम्हाला कोणतीही शारीरिक अस्वस्थता नसेल तर तुमची उपस्थिती महत्त्वपूर्ण असल्याचं पीएमओने नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.