Belgaum : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुटणार? पंतप्रधान कार्यालयाचं थेट म. ए. समितीला पत्र; म्हणाले, बेळगाव सीमाप्रश्न..

सीमाभागातील मराठी भाषिक गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने लढा देत आहेत.
Prime Minister Office Belgaum Boundary Dispute
Prime Minister Office Belgaum Boundary Disputeesakal
Updated on
Summary

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नामुळे सातत्याने अशांतता निर्माण होत आहे.

बेळगाव : सीमाप्रश्न (Belgaum Boundary Dispute) लोकशाही मार्गाने सुटू शकतो, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीला (Maharashtra Ekikaran Samiti Belgaum) पत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेदेखील सीमाप्रश्नाबाबत आश्वासक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने नवीन संसद भवनाचे उद्‌घाटन करताना देशातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे युवा समितीने पंतप्रधान कार्यालयाला (PM Office) पत्र पाठवून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती.

Prime Minister Office Belgaum Boundary Dispute
Caste Census Report : बिहारनंतर आता कर्नाटकात जातनिहाय जनगणना; 'या' महिन्यात मुख्यमंत्री करणार अहवाल सादर!

तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नामुळे सातत्याने अशांतता निर्माण होत आहे. त्यामुळे इतर राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी ज्या प्रमाणे पुढाकार घेण्यात आला. त्याप्रमाणे कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन लाखो मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली होती.

त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने युवा समितीला पत्र पाठवून सध्या सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे हा प्रश्न लोकशाहीच्या मार्गातून सुटू शकतो, असे मत व्यक्त केले आहे.

Prime Minister Office Belgaum Boundary Dispute
Shambhuraj Desai : आरेरावीची भाषा मंत्र्याला भोवली! शंभूराज देसाईंच्या पत्रकार परिषदांवर सातारा पत्रकार संघाचा बहिष्कार

गेल्या काही वर्षांपासून सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने साक्षी पुरावे नोंदवण्याची सूचना केल्यानंतर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. मात्र कर्नाटक सरकार सातत्याने वेळ काढूपणा करीत आहे, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Prime Minister Office Belgaum Boundary Dispute
Big News : 'वंचित'चे प्रमुख प्रकाश आंबेडकर 'इंडिया आघाडी'सोबत जाण्‍यास तयार; साताऱ्यात केली मोठी घोषणा

सीमाभागातील मराठी भाषिक गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. याची दखल केंद्र सरकारने घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान कार्यालयाने सीमाप्रश्न असल्याचे मान्य केले आहे. आता प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

-अंकुश केसरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.