PM मोदी यूट्यूबवर देखील अव्वल, अनेक जागतिक नेत्यांना टाकलं मागे

PM Narendra Modi
PM Narendra Modi sakal
Updated on

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या यूट्यूब (YouTube) चॅनलने 1 कोटी सब्सक्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे. जगातील आघाडीच्या राजकारण्यांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. पीएम मोदींनंतर, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो हे यूट्यूबवर सर्वाधिक सब्सक्राइबर्सच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच्या चॅनलचे 36 लाख सबस्क्राइबर्स आहेत.तर मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे 30.7 मिलीयन सब्सक्राइबर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पीएम नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलवर 1 फेब्रुवारीपर्यंत एकूण 15,477 व्हिडिओ अपलोड झाले आहेत. यातील बहुतांश व्हिडिओ मन की बात, पंतप्रधानांचे लाईव्ह कार्यक्रम किंवा भाषणे यांच्याशी संबंधित आहेत. गेल्या 1 दिवसात त्याच्या चॅनलवर एकूण 25 व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. 26 ऑक्टोबर 2007 रोजी त्यांनी हे चॅनल तयार केले. त्याला एकूण 1,646,055,679 व्ह्यूज मिळाले आहेत.

मोदींच्या चॅनलवरील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ हा एका दिव्यांगाचा आहे. या व्हिडिओमध्ये मुलगा पीएम मोदींना भेटताना त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेत आहे. हा व्हिडिओ केवळ 14 सेकंदांचा आहे, ज्याला 7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ 2019 मध्ये अपलोड करण्यात आला होता.

PM Narendra Modi
ही इलेक्ट्रिक कार ठरतेय ग्राहकांची पसंत, एका चार्जमध्ये धावते 310km

भारतातील इतर नेत्यांचे YouTube सब्सक्राइबर्स

देशातील काही राष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत देखील पीएम मोदी YouTube सब्सक्राइबर्स संख्येमध्ये अव्वल स्थानावर आहेत. भारतातील इतर लोकप्रिय राजकारण्यांबद्दल बोलायचे झाल्यास, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे युट्यूबवर तब्बल 5.25 लाख, पक्षाचे नेते शशी थरूर 4.39 लाख, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी 3.73 लाख, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कळघम (DMK) चे प्रमुख एमके स्टॅलिन यांचे 2.12 लाख आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि AAP नेते केजरीवाल यांचे YouTube वर 1.37 लाख सब्सक्राइबर्स आहेत.

PM Narendra Modi
Google Photos वरून फोटो, व्हिडीओ डिलीट झालेत? 'असे' करु शकता रिस्टोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.