Narendra Modi : इतिहासातून पाकिस्तानने धडा घेतला नाही;कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधानांचे हुतात्म्यांना अभिवादन

इतिहासात युद्धात झालेल्या पराभवातून पाकिस्तानने धडा घेतला नसून अजुनही छुप्या युद्धाच्या मदतीने देशात कुरापती सुरूच आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला. कारगिल विजय दिवसनिमित्त द्रास येथील वॉर मेमोरिअल येथे पंतप्रधानांनी हुतात्मा स्मारकास अभिवादन केले.
Narendra Modi
Narendra Modi sakal
Updated on

द्रास (लडाख) : इतिहासात युद्धात झालेल्या पराभवातून पाकिस्तानने धडा घेतला नसून अजुनही छुप्या युद्धाच्या मदतीने देशात कुरापती सुरूच आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला. कारगिल विजय दिवसनिमित्त द्रास येथील वॉर मेमोरिअल येथे पंतप्रधानांनी हुतात्मा स्मारकास अभिवादन केले. या वेळी बोलताना त्यांनी कारगिलमध्ये भारताने युद्धच जिंकले नाही तर जगाला सत्य, संयम, सामर्थ्याचे घडविले, असे सांगितले.

१९९९च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानच्या सैनिकांना हुसकावून लावत विजय मिळवला आणि त्यानिमित्त २६ जुलै रोजी कारगिल विजय देशभरात साजरा करण्यात येतो. यानिमित्त द्रास येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कारगिल विजय दिवस जवानांच्या शाैर्याचे प्रतीक आहे. दिवसांमागून दिवस जातात, महिने, वर्ष जातात, दशकही लोटतात, शतकही जातात, परंतु प्राणाची बाजी लावणाऱ्या वीराचे नाव कायम स्मरणात राहते. कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकले नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्य याचे घडविले.

कारगिलसारख्या कठीण आणि उंचीवर लष्कराने केलेले युद्ध आजही आठवते. पाकिस्तानवर टीकास्त्र करताना मोदी म्हणाले, भारताने तत्कालीन काळात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाकिस्तानने विश्‍वासघात केला. परिणामी सत्यासमोर असत्य आणि दहशतवाद पराभूत झाला. पाकिस्तानने भूतकाळात केलेल्या कुरापतीला भारताने वेळोवेळी चोख उत्तर दिले आहे. तरीही पाकिस्तान इतिहासातून काहीच शिकलेला नाही. दहशतवाद्याच्या जिवावर, छुप्या युद्धाच्या मदतीने पाकिस्तान अजूनही कारस्थान करत आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की, त्यांचे कारस्थान कधीच यशस्वी होणार नाही. दहशतवाद्यांचे मुळानिशी उच्चाटन करू. लडाख असो जम्मू काश्‍मीर असो, विकासाला आव्हान देणाऱ्या शक्तींना ठेचून काढू, असेही मोदी म्हणाले.

‘शिंकुन ला’ बोगद्याचे काम सुरू

लडाख येथे ‘शिंकुन ला’ बोगदा प्रकल्पाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्लास्ट’ करत सुरू केले. पंतप्रधान कार्यालयाच्या मते, हा प्रकल्प लेहला बारामाही संपर्क प्रस्थापित ठेवण्यात मदत करणार आहे आणि तो पूर्ण झाल्यास जगातील सर्वात उंचीवरचा बोगदा असेल. गेल्या काही वर्षांपासून सरकार लडाख येथे अधिक लक्ष केंद्रित करत आहे. नवीन रस्ते आणि पुलांची निर्मिती केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, लडाखमध्ये विकासाची गंगा वाहत आहे. हा बोगदा लडाखचा विकास आणि उज्ज्वल भवितव्य निश्‍चित करण्याचा मार्ग खुला करेल.

जम्मू काश्‍मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. काश्‍मीरला आता विकासाची आस लागली आहे. मोठमोठी स्वप्न पाहिली जात आहेत. काश्‍मीरची ओळख जी-२० सारख्या जागतिक परिषदेचे ठिकाण म्हणून होत आहे. पायाभूत विकासाबरोबरच काश्‍मीरमध्ये पर्यटन क्षेत्राचा विकास होत आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.