नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढती रूग्णसंख्या पाहता खासगी कार्यालये बंद करण्याचा आणि वर्क फ्रॉम होम करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. (Delhi Corona Cases) याबाबत दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) मंगळवारी आदेश काढले आहेत. यामध्ये सूट देण्यात आलेल्या (All Private Offices Closed In Delhi) श्रेणींमध्ये येणारी कार्यालये वगळता सर्व खासगी कार्यालये दिल्लीत बंद राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या, दिल्लीतील खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात आली होती, तर इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) देण्यात आले होते. मात्र, नव्या आदेशानुसार सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या एक-दोन दिवसांत दिल्लीतील कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यानंतर संसर्ग होणाऱ्यांची संख्या कमी होईल, असे मत दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन व्यक्त केले आहे. (Private Offices In Delhi shall be closed)
सूट देण्यात आलेली कार्यालये
1. खासगी बँका
2. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालये (स्वतंत्रपणे सूचीबद्ध)
3. विमा / मेडिक्लेम कंपनी
4. उत्पादन आणि वितरणाचे व्यवस्थापन आवश्यक असलेल्या फार्मा कंपन्यांची कार्यालये
5. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे नियमन केलेल्या संस्था किंवा मध्यस्थ
6. सर्व नॉन-बँकिंग वित्तीय कॉर्पोरेशन
7. सर्व मायक्रोफायनान्स संस्था
8. न्यायालये/न्यायाधिकरण किंवा आयोग खुले असल्यास वकिलांची कार्यालये
9. कुरिअर सेवा
रेस्टॉरंट, बार राहणार बंद
यापूर्वी सोमवारी दिल्लीतील रेस्टॉरंट आणि बार (Restaurant & Bar Closed In Delhi Due to Covid Cases ) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, टेकअवे सुविधा (Take away ) सुरू राहील. वाढत्या कोरोना (Corona In Delhi) रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी दिल्लीत 19,166 नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली होती, तर, गेल्या 24 तासांत 17 रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या दिल्लीतील सकारात्मकता दर 25 टक्के इतका असून, तपासणी करणाऱ्या प्रत्येक चौथ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. (Delhi Corona Cases Count )
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.