Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

लोकसभेला दोन मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडली होती.
priyanka gandhi
priyanka gandhiSakal
Updated on

लोकसभेला दोन मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडली होती. या ठिकाणी आज पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण काँग्रेस या ठिकाणाहून प्रियांका गांधी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं अखेर प्रियांका गांधी या निवडणूक रिंगणात दाखल झाल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे.

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसह देशभरातील ४८ विधानसभा आणि २ लोकसभा पोटनिवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं मंगळवारी केली. यामध्ये केरळमधील दोन विधानसभा मतदारसंघ आणि वायनाड या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अशा तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा आज काँग्रेसकडून करण्यात आली.

priyanka gandhi
Maharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केलेल्या या नावांचं अधिकृत पत्रक पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार, वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पल्लकड विधानसभा मतदारसंघातून राहुल मामाकुटाथिल यांना तर अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या चेलक्कारा विधानसभा मतदारसंघातून रम्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Priyanka Gandhi Latest Marathi News

priyanka gandhi
Maharashtra MLC: राज्यपाल नियुक्त 12 ऐवजी 7 आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब? या महत्वाच्या नावांची चर्चा

काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ

राहुल गांधींना दोन वेळा लोकसभेत पाठवणारा वायनाड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. त्यामुळंच या जागेवरुन प्रियांका गांधी यांना काँग्रेसनं उतरवलं आहे. गेल्या पाच महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली होती, त्यानंतर आता जर प्रियांका गांधींना वायनाडवासियांनी निवडून दिलं तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी असे गांधी कुटुंबातील दोन जण लोकसभेत खासदार म्हणून दिसू शकतील.

राहुल गांधी यांनी वानयाडबरोबरच रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर त्यांचा विजय झाला होता. त्यामुळं त्यांनी गांधी कुटुंबाचा पारंपारिक मतदारसंघ असलेला रायबरेली मतदारसंघ कायम ठेवत वानयाड हा मतदारसंघ सोडला होता. त्यामुळं या जागेवर आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.