Priyanka Gandhi
Priyanka Gandhisakal

Priyanka Gandhi : शिक्षण यंत्रणा माफियांच्या हातात ; प्रियांका

‘नीट’सह विविध परीक्षांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. या सरकारने संपूर्ण शिक्षण यंत्रणा माफिया आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात दिल्याचा आरोप त्यांनी केला.
Published on

नवी दिल्ली : ‘नीट’सह विविध परीक्षांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. या सरकारने संपूर्ण शिक्षण यंत्रणा माफिया आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात दिल्याचा आरोप त्यांनी केला.

परीक्षांमधील गोंधळ उघडकीस आल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. तसेच, या संस्थेचे महासंचालक सुबोध सिंग यांनाही घरी पाठवले आहे.

या पार्श्वभूमीवर ‘एक्स’वरून टीका करताना प्रियांका म्हणाल्या, ‘‘नीट-यूजीची प्रश्‍नपत्रिका फुटली, तर नीट-पीजी, यूजीसी-नेट, सीएसआयआर-नेट या परीक्षा रद्द झाल्या आहेत. देशातील सर्वांत महत्त्वाच्या परीक्षांची ही स्थिती आहे. भाजपच्या सत्ताकाळात परीक्षा यंत्रणा माफिया व भ्रष्ट लोकांच्या हाती गेली आहे.

राजकीय हेकटपणा व शिक्षण यंत्रणा हाताळताना दाखविला जात असलेला अहंकार यामुळेच अकार्यक्षम लोकांच्या हातात सूत्रे जाऊन प्रश्‍नपत्रिका फुटण्याचे आणि परीक्षा रद्द होण्याचे प्रकार घडत आहेत. भाजपचे सरकार गैरप्रकार न करता एकही परीक्षा हाताळू शकत नाही,’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com