Avtar Khand: लंडनमध्ये खलिस्तानी झेंडा फडकवणाऱ्या मास्टरमाइंडचा मृत्यू, कारण अस्पष्ट

भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्याच्या सुत्रधाराचा मृत्यू
Pro-Khalistan activist Avtar Singh Khanda dies in UK hospital )
Pro-Khalistan activist Avtar Singh Khanda dies in UK hospital )
Updated on

लंडनमध्ये खलिस्तानी झेंडा फडकवणाऱ्या मास्टरमाइंडचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. खलिस्तान लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा स्वयंघोषित प्रमुख अवतार सिंग खांडा याचे आज बर्मिंगहॅम येथील सँडवेल रुग्णालयात निधन झाले. (Pro-Khalistan activist Avtar Singh Khanda dies in UK hospital )

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात 19 मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराचा तो मुख्य सूत्रधार होता. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, मेडिकल रिपोर्ट अजून आला नाही.

अवतार सिंह खांडाला गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Latest Marathi News)

खांडाला अनेक दिवस लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. दरम्यान, त्याच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pro-Khalistan activist Avtar Singh Khanda dies in UK hospital )
Biperjoy Alert in Gujarat : येत्या काळात गुजरातला अनेक वादळांचा सामना करावा लागू शकतो

खांडा यांना रणजोध सिंग या नावानेही ओळखले जात होते. त्याने अनेक वेळा यूकेमध्ये स्वत:साठी राजकीय निर्वासित दर्जा मागितला होता. त्याचे वडील देखील खलिस्तानी दहशतवादी होते, ज्यांना 1991 मध्ये सुरक्षा दलांनी मारले होते. एवढेच नाही तर खांडाच्या आईचे आणखी एक खलिस्तानी दहशतवादी गुरजंत सिंग बुद्ध सिंगवाला यांच्याशीही संबंध होते. (Latest Marathi News)

Pro-Khalistan activist Avtar Singh Khanda dies in UK hospital )
Uttarkashi Love Jihad Row : लव्ह जिहाद प्रकरण पेटलं; 3 वर्षात 1035 हिंदू मुली बेपत्ता, महापंचायत भरणार

ब्रिटनमधून मिळालेल्या माहितीनुसार, खांडाच्या समर्थकांना मेडिकल रिपोर्टमध्ये विषबाधा झाल्याचे सूचित करायचे आहे, जेणेकरून ते त्याला शहीद घोषित करू शकतील आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांवर हत्येचा आरोप करू शकतील. मात्र, खांदा ब्लड कॅन्सरने त्रस्त होता आणि त्याला सँडवेल आणि वेस्ट बर्मिंगहॅम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.(Latest Marathi News)

Pro-Khalistan activist Avtar Singh Khanda dies in UK hospital )
Viral Video : याला म्हणतात हाडाचा रिपोर्टर! पाण्याची खोली दाखवण्यासाठी मारली पाण्यात उडी

राष्ट्रीय तपास संस्थेने 19 मार्च रोजी नियोजित आंदोलनादरम्यान लंडन उच्चायुक्तालयात भारतीय ध्वजाची विटंबना करणारा मुख्य आरोपी म्हणून खांदा याची ओळख पटवली आहे. दरम्यान, इतर खलिस्तानी सहानुभूतीदारांप्रमाणे खांदा हा विद्यार्थी व्हिसाद्वारे ब्रिटनमध्ये दाखल झाला आणि लगेच ब्रिटनमधील काही प्रमुख गुरुद्वारांमध्ये कार्यरत असलेल्या फुटीरतावादी दलामध्ये सामील झाला. या गुरुद्वारांचे व्यवस्थापन खलिस्तानी समर्थकांद्वारे केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.