नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाच्या उद्रेकामुळे कोविडच्या रुग्णांवर उपचारांसाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर या इंजेक्शनचं उत्पादन वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने संबंधित फार्मा कंपन्यांन्या केल्या आहेत. त्यानुसार याचं उत्पादन सुरु झालं असून पुढील पंधरा दिवसात दररोज ३ लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा खुल्या बाजारात पुरवठा केला जाईल, असं केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. सध्या दरदिवशी दीड लाख इंजेक्शनचं उत्पादन केलं जात आहे.
मांडवीय म्हणाले, "अँटी व्हायरल औषध असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर याच्या किंमतही कमी करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. आजपासून दररोज दीड लाख रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे डोस तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पंधरा दिवसात हे उत्पादन दुप्पट केलं जाईल. त्यानुसार दररोज ३ लाख डोस बाजारात उपलब्ध करुन दिले जातील."
देशात सध्या रेमडेसिव्हीर बनवणारे २० प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये आणखी २० प्रकल्प सुरु करण्यास भारत सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. येत्या काळात रेमडेसिव्हीरचा अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे, असंही मांडवीय यांनी म्हटलं आहे.
गेल्या वर्षी देण्यात आली होती परवानगी
कोविड रुग्णाला उपचारांदरम्यान रेमडेसिव्हीर इंजेक्शन देण्यास गेल्यावर्षी जूनमध्ये परवानगी देण्यात आली होती. डॉक्टरांनी लिहून दिल्यावरच हे इंजेक्शन मेडिकलमधून दिलं जात होतं. तसेच केवळ रुग्णालयं आणि मेडिकल्समध्येचं हे इंजेक्शन ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
काळ्याबाजारात तिप्पट किंमतीत विक्री
सरकारच्या आवाहनानंतर शनिवारी अनेक फार्मा कंपन्यांनी स्वेच्छेनं रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या किंमती कमी केल्या. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने त्याची तिप्पट किंमतीत काळ्याबाजारात विक्री केली जात होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.