Karnataka Student Called Terrorist: एका मुस्लिम विद्यार्थ्याची दहशतवादाशी तुलना केल्याबद्दल कर्नाटकातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) उडुपी येथील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे घडली. प्राध्यापकाने मुस्लिम विद्यार्थ्याला दहशतवादी संबोधले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतप विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तराचं कौतुक होत आहे.
प्राध्यापकाविरोधात कोणतीही तक्रार न करण्याचा निर्णयही विद्यार्थ्याने घेतला आहे. तसेच विद्यापीठाने विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रोफेसरने विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले आणि मुस्लिम नाव ऐकून म्हणाले, "अरे, तू कसाबसारखाच आहेस." २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थ्याला प्राध्यापकाशी भांडताना दिसत आहे आणि एका दहशतवाद्याशी त्याची तुलना करून त्याच्या धर्माची बदनामी केल्याचा आरोप करताना दिसत आहे.
हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?
विद्यार्थ्याने प्राध्यापकाला दिलं उत्तर
व्हिडिओतील विद्यार्थी म्हणतो, "26/11 हा मजाक नव्हता. या देशात मुस्लिम असणं आणि रोज या सगळ्याला तोंड देणं काही गंमत नाही, सर. तुम्ही माझ्या धर्माची चेष्टा करू शकत नाही, तीही अशा अपमानास्पद पद्धतीने. हे योग्य नाही." प्राध्यापकाने विद्यार्थ्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, "तू माझ्या मुलासारखा आहेस." यावर विद्यार्थी म्हणाला, "तूम्ही तुमच्या मुलाशी असं बोलल का? त्याला दहशतवादी म्हणाल का?"
प्राध्यापक यावर 'नाही' म्हणाले आणि विद्यार्थी पुढे म्हणाला, "मग इतक्या लोकांसमोर तूम्ही मला असं कसं म्हणू शकता? तूम्ही शिक्षक आहात आणि शिकवतास. एक सॉरी म्हणून तुम्ही तुमच्या विचारसरणीत बदल करू शकत नाही." व्हिडिओमध्ये शिक्षक माफी मागताना दिसत आहेत. यादरम्यान इतर विद्यार्थी हे सर्व शांतपणे पाहत राहिले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संस्थेने शिक्षकाला निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आल्याचे संस्थेने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.