Propose Day 2024 : प्रेम करावं तर नेताजी आणि एमिलीसारखं; दुरावा असूनही शेवटपर्यंत निभावलं जाणारं!

या अनोख्या लग्नाबद्दल फक्त नेहरूंना माहीत होतं
Propose Day 2023
Propose Day 2023esakal
Updated on

‘तूम मुझे खून दो, मै तूम्हे आझादी दुंगा’, असे शब्द कानावर पडले की एकच नाव आपल्याला आठवतं. ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच. नेताजींचं संपूर्ण जीवन एक रहस्यच गाथाच आहे. त्यांच्या जीवनात कोणतीही गोष्ट सहज घडलेली नाही. मग, त्यांच्या आयुष्यातील एकमेव प्रेम तरी त्यांना कसे सहज मिळेल.

नेताजी यांचे लग्न झाले होते का?, ते कोणाच्या प्रेमात होते का? अशा प्रश्नांची उत्तरे आजही अनेकांना माहिती नाहीत. आज व्हॅलेंटाईन विकमधील दुसरा दिवस आहे. प्रपोज डे. यानिमित्तानेच आज नेताजी आणि त्यांची अनोखी प्रेमकथा जाणून घेऊ.

Propose Day 2023
Subhash Chandra bose : आजच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा फडकला भारतभूमीवर तिरंगा!

1934 ची गोष्ट. ब्रिटीश सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतातून हद्दपार केले होते. तेव्हा ते आजारीही होते. त्यामूळे त्यांनी आपला मुक्काम युरोपमधील व्हिएन्ना येथे हलवला होता. येथे राहून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यांशी निगडित सहकाऱ्यांना पत्रे लिहिणे सुरू ठेवले.

Propose Day 2023
Subhash Chandra Bose : नेताजींनीच गांधींना सर्वप्रथम म्हटलं होतं राष्ट्रपिता; जाणून घ्या रंजक कहाणी

तिथेच त्यांना स्वत:चे आत्मचरीत्र लिहीण्याचा विचार आला. त्यासाठी त्यांना एका टायपिस्टची गरज होती. मग त्यांच्या एका मित्राने त्याची मिस एमिली शँकलेशी त्यांची ओळख करून दिली. नेताजींनी एमिलीला कामावर ठेवले.

Propose Day 2023
Subhash Chandra Bose : बोस यांच्या गाजलेल्या प्रत्येक ओळींत दडलंय उत्तम आयुष्याचं सार

त्यावेळी नेताजी आणि एमिली एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांच्यात प्रेम फुलत गेले. दोघेही एकत्र युरोपात अनेक ठिकाणी फिरायला जायचे. एकमेकांसोबत वेळ घालवायचे. दोन वर्षांनंतर 1936 मध्ये नेताजी सुभाषचंद्र भारतात परतले.

Propose Day 2023
Propose Day : तिला आधी या लाइन्स पाठवून इंप्रेस करा अन् मग प्रपोज

त्यांच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रक असूनही ते एमिलीला पत्र लिहिण्यासाठी वेळ काढायचे. नेताजींनी लिहिलेली ही पत्रे स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी प्रकाशित झाली तेव्हा लोकांना त्यांच्यातील रोमँटिक बाजू पहायला मिळाली. नेताजी जीव ओतूनच ती पत्रे लिहीत असावेत असे दिसते.

Propose Day 2023
Propose Day : प्रपोज केलंय अन् समोरच्याने थेट नकार दिला? मग काय कराल?

“तू माझ्या प्रेमात पडलेली पहिली स्त्री आहेस. माझ्या आयुष्यातही तू शेवटची स्त्री राहावी अशी माझी इच्छा आहे, असे रोमॅंटीक भाष्यही नेताजींनीच केलेले आहे, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. एमिली आणि नेताजी यांनी लग्न केलं. त्या लग्नात ना हार फुले होते ना भडजी तरीही नेताजी आणि एमिली एकमेकांचे झाले. त्यांना अनिता नावाची मुलगी झाली.

Propose Day 2023
Propose Day : राशीनुसार गिफ्ट देऊन जोडिदाराला करा प्रपोज

मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी म्हणजे 8 जानेवारी 1943 रोजी सुभाषचंद्र जपानला निघाले. एमिली आणि मुलगी अनिता यांच्यासोबतची ही शेवटची भेट ठरली कारण 1945मध्ये विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

Propose Day 2023
Propose Day Horoscope : राशीनुसार अशा प्रकारे प्रपोज करा, होकार मिळालाच समजा

या अनोख्या लग्नाबद्दल फक्त नेहरूंना माहीत होतं. पण, नंतरच्या काळात ते बोस यांच्या कुटुंबालाही माहिती झाले. म्हणूनच नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर एमिलीसाठी दर महिन्याला ठराविक रक्कम पाठवायला सुरुवात केली. जेणेकरून तिचा आणि मुलगी अनिताचा उजरनिर्वाह पार पडू शकेल.

Propose Day 2023
Propose Day : समोरच्याला Hurt न करता कसा द्याल नकार

जेव्हा बोस यांच्या कुटुंबियांनी एमिली यांची भेट घेतली. तेव्हा तिला भारतात येण्यास सांगितले. मात्र, एमिलीच्या आईची प्रकृती ठिक नसल्याने त्या येऊ शकल्या नाहीत. पण, 1९६० मध्ये नेताजींची मुलगी अनिता भारतात येऊन गेल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.