Proud Moment : NDA मध्ये सुरू होतोय महिलाराज, अक्षय कुमारने शेअर केलेला हा फोटो पाहून छाती अभिमानाने फुलेल

आजच्याच दिवशी आपण किती शक्तीशाली झालो आहोत याची प्रचिती देणारी एक घटना घडली आहे
NDA Pune
NDA Puneesakal
Updated on

आजच्या दिवशी पाकिस्तानने भारताच्या हवाई तळावर हल्ला केला होता. ३ डिसेंबर १९७१ रोजी संध्याकाळी ५.४५ मिनिटांनी हा हल्ला झाला होता. या घटनेला आता ५० वर्ष लोटली आहेत. पाकने केलेल्या त्या भ्याड हल्ल्यामूळेच १९७१ मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धाला सुरूवात झाली होती. आजही त्या युद्धाच्या कटू आठवणी ताज्या होतात. आणि आजच्याच दिवशी आपण किती शक्तीशाली झालो आहोत याची प्रचिती देणारी एक घटना घडली आहे. ती घटना पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने आणखीच फुगेल. NDA First Batch of Female Cadets

राष्ट्रीय सुरक्षा दलात सहभागी होणारी महिला कॅडेट्सची पहिली बॅच आज निवडण्यात आली आहे. लवकरच त्या मुली त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सीमेवर तैनात होतील. भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड या अकाऊंटवरून महिला कॅडेट्सच्या पहिल्या बॅचचे फोटो शेअर केले आहेत. हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून त्यात १९ मुली आणि अधिकारी दिसत आहेत.

भारतीय संरक्षण दलांसाठी ऑगस्ट २०२२ हा ऐतिहासिक दिवस होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर खडकवासला पुणे हे जेंडर न्यूट्रल ट्रेनिंग अॅकॅडमी बनले. या १९ महिला कॅडेट्सचे प्रशिक्षण पुरुष कॅडेट्सप्रमाणे सुरू झाले. महिला कॅडेट्सना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर त्यांना नियुक्त केले जाईल, असा इथला नियम आहे.

NDA Pune
1971 War Vijay Diwas: आजच्या दिवशी केली एक चूक अन् पाकिस्तानचे झाले दोन तुकडे..

बुधवारी भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांनी या कॅडेट्सची भेट घेतली. जून 2022 मध्ये 19 महिला कॅडेट्सच्या बॅचला एनडीए पुणे येथे प्रवेश मिळाला. यामध्ये 10 आर्मी, 6 एअरफोर्स आणि तीन नेव्ही कॅडेट्सचा समावेश आहे. महिला कॅडेट्सची ही तुकडी मे 2025 मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत रुजू होणार आहे.

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल ए के सिंह 143 कोर्सच्या पासिंग आऊट परेडमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी महिला कॅडेट्सच्या पहिल्या बॅचची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. सर्जन-व्हाइस एडीएम आरती सरीन, कमांडंट आणि संचालक, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) हे देखील उपस्थित होते.

NDA Pune
Viral Letter : "दोन दिवसानंतर सुट्टी पाहीजे, आई मरणार आहे" धक्कादायक Application व्हायरल

ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई, इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला, एअरफोर्स अकादमी हैदराबाद, येथे पुरुष आणि महिलांना समान प्रशिक्षण आधीच दिले जात आहे. त्याची सुरुवात 2022 पासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे येथे झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 1.77 लाख महिला परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी फक्त 19 महिलांची निवड झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.