ऑनलाईन गेम पबजी (PUBG) सर्वांनाच माहिती आहे. अनेक मुलं पबजीच्या आहारी गेल्याची प्रकरणे आपण रोज बघतो. मुळात पबजी हा एक बॅटल रॉयल गेम्स आहे. त्यामुळे या गेममध्ये सहसा लढाई दिसून येते. पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की पबजीने एक लव स्टोरी घडवून आणली तर.. नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय.
असं म्हणातात प्रेमात कोणतीच सीमा नसते. प्रेमात सर्व सीमा ओलांडल्या जातात. याचाच प्रत्यय आलेला आहे एका ऑनलाईन आणि फेमस गेम मधून. हो, मध्य प्रदेशच्या रायसेन येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे उत्तराखंडच्या नैनीताल येथे राहणाऱ्या मुलीशी पबजी खेळताना पबजी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर जे काही झाले ते कोणत्या मुव्हीच्या कथेप्रमाणे होते. चला तर जाणून घेऊया.
अडीच वर्षापुर्वी योगेशनी शीतल नावाच्या मुलीसोबत पबजी गेम खेळताना मैत्री झाली. पबजी गेममध्ये तुम्ही समोरच्या खेळाडूला तोपर्यंत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता जोपर्यंत तुम्हाला त्याची यूजर आईडी माहिती असते. जर तुम्हाला यूजर आईडी माहिती नसेल तरी तुम्ही सरळ समोरच्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता.
मैत्री झाल्यानंतर दोघे एकत्र खेळायचे. इन-गेम माइक्रोफोनचा वापर करत एकमेकांशी बोलायचे. आणि त्यामुळे ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. आणि एक दुसऱ्याचा नंबर त्यांनी एक्सचेंज केला. त्यानंतर त्यांनी whatsapp वर टेक्स्टिंग आणि व्हिडिओ कॉलिंग सुरू केली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते एकमेकांशी भेटले सुद्धा.
अडीच वर्षानंतर दोघांनी नैनीताल मध्ये विवाह केला. शीतल आपला अनुभव सांगताना म्हणते की ती बॅचलर ऑफ सायंस मध्ये ती आपली बॅचलर डिग्री करत होती आणि पबजी गेम खेळायला तीला आवडायचा. शीतलच्या कुटूंब या विवाहाच्या विरोधात होते. एवढंच काय तर घरच्यांनी शीतल हरवली असल्याची पोलिसात तक्रार केली. त्याप्रमाणे पोलिस नैनितालला पोहचले आणि शीतलचा शोध घेतला. शीतल सापडली पण तिने घरी जाण्यास नकार दिला. लग्नाच्या वयोमर्यादेनुसार तिने लग्न केल्याने पोलिसही काहीही करू शकले नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.