PUBGच्या वादातून आईची हत्या; बाल संरक्षण आयोगाची केंद्र सरकारकडे माहितीची मागणी

PUBG खेळण्यास मनाई केल्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये एका मुलाने आपल्या आईची हत्या केली होती.
pubg
pubgSakal
Updated on

नवी दिल्ली : मागच्या शनिवारी उत्तरप्रदेशमधील यमुनापूरम येथे एका महिलेची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या एका आठवड्यानंतरही याची चर्चा चालू आहे. कारण यामागचा सूत्रधार दुसरा तिसरा कुणी नसून त्या महिलेचा मुलगा होता. चौकशीत त्याने पबजीच्या नादात आपल्या आईचा खून केल्याचं समोर आलं आहे. पबजी खेळण्यास नकार दिल्याने त्याने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहिले आहे.

(PUBG Controversy)

pubg
USB-C Charging: युरोपात Apple ला करावे लागणार फोनच्या डिझाईन मध्ये बदल

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने मीडिया रिपोर्टच्या अनुसार इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी पबजीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पत्रात लिहिलं आहे की, "भारतात बंदी घालण्यात आलेला एक खेळ अजूनही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी उपलब्ध आहे. आयोगाने लवकरात लवकर यावर कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात आणि दहा दिवसाच्या आत अशा खेळांची यादी जाहीर करण्यात यावी." अशी मागणी बाल संरक्षण कार्यालयाने केली आहे.

pubg
'या' शेअरचा एका महिन्यात 63% परतावा; तोट्यातून साकारला फायदा

दरम्यान मागच्या शनिवारी उत्तरप्रदेशमध्ये एका महिलेची हत्या करण्यात आली होती. लखनऊमधील यमुनापूरम येथील साधना सिंह या महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या त्या महिलेच्या मुलानेच केल्याचं चौकशीतून पुढे आलं आहे. त्यानंतर बाल अधिकार संरक्षण आयोगाने केंद्र सरकारला पत्र लिहित अशा खेळांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.