Good News : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; मुख्यमंत्र्यांकडून 'या' प्रस्तावाला मंजुरी

मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी सार्वजनिक सुट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
Mahatma Jyotiba Phule Jayanti
Mahatma Jyotiba Phule Jayantiesakal
Updated on
Summary

यापूर्वी गेहलोत सरकारनं 28 जानेवारीला भगवान देवनारायण जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केली होती.

प्रसिद्ध समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त (Mahatma Jyotiba Phule Jayanti) 11 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी (Public Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी सार्वजनिक सुट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आतापर्यंत केवळ फुले जयंतीला ऐच्छिक सुट्टी दिली जात होती.

गेहलोत सरकारनं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलंय, 'महिला आणि बाल विकास मंत्री ममता भूपेश, राष्ट्रीय फुले ब्रिगेड यांच्यासह अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणारी पत्रं लिहिली होती, त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला.'

Mahatma Jyotiba Phule Jayanti
Karnataka Election : मुख्यमंत्री बोम्मई 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार; भाजपची यादी आज जाहीर होण्याची शक्यता!

समाजसुधारक ज्योतिबा फुले यांनी देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आणि समाज मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीये. समाजाला दुष्कृत्यांपासून मुक्त करण्याचं, मुली आणि दलितांना शिक्षणाशी जोडण्याचं काम त्यांनी केलं. शेतकरी, मजुरांच्या हक्कासाठीही त्यांनी प्रयत्न केलेत.

Mahatma Jyotiba Phule Jayanti
US Visa : अमेरिकेला जाण्याचा विचार करताय? मग, आधी ही बातमी वाचा; परराष्ट्र विभागानं घेतलाय मोठा निर्णय

यापूर्वी गेहलोत सरकारनं 28 जानेवारीला भगवान देवनारायण जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केली होती. त्यामुळं आता राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या 30 आणि ऐच्छिक सुट्ट्यांची संख्या 20 झाली आहे.

Mahatma Jyotiba Phule Jayanti
Rajasthan : आपल्याच सरकारविरुध्द उपसलं उपोषणाचं हत्यार; पायलट 'हनुमानां'चा सल्ला पाळणार?

तर, दुसरीकडं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अनेक ठिकाणी फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार असून, फुले यांच्या योगदानाचंही स्मरण करण्यात येणार आहे. दरम्यान, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे देखील वसुंधरा सरकारच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी 11 एप्रिल रोजी उपोषण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.