PUC Exam : परीक्षा केंद्रात मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यावर बंदी; शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

हिजाब परिधान करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही.
Hijab Row
Hijab Rowesakal
Updated on
Summary

परीक्षा केंद्रात हिजाबवर बंदी घातल्यानंतर परीक्षा (PUC Exam) देण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Karnataka News : प्री-विद्यापीठ अभ्यासक्रमाच्या परीक्षेत हिजाब (Hijab) घालण्यास परवानगी नाही, असं स्पष्ट मत कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश (Education Minister BC Nagesh) यांनी व्यक्त केलं.

दुसरी PUC परीक्षा 9 मार्चपासून सुरू होत आहे. शिक्षणमंत्री म्हणाले, 'गतवर्षीप्रमाणं यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश घालूनच यावं लागणार आहे. हिजाब परिधान करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था आणि शासन नियमानुसार चालत आहे.'

शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, परीक्षा केंद्रात हिजाबवर बंदी घातल्यानंतर परीक्षा (PUC Exam) देण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, त्याची आकडेवारी त्यांनी शेअर केलेली नाही. नागेश म्हणाले, 'हिजाब बंदीनंतर अधिक मुस्लिम मुली परीक्षा देण्यासाठी येत आहेत. आता अधिक मुस्लिम मुलींनी (Muslim Girls) परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.'

Hijab Row
राजघराण्यावर बोलताना लाज राखा, मागं हाच छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागत होता; उदयनराजेंनी सुनावलं
Hijab Row
Devendra Fadnavis : संदीप देशपांडेंनी काही शंका व्यक्त केल्या; फडणवीसांनी दिली महत्वाची अपडेट

हिजाब बंदीविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी नकार दिला होता. न्यायालयात तातडीनं सुनावणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी 9 तारखेपासून परीक्षा सुरू होत आहे, त्यामुळं त्यावर तात्काळ सुनावणी करावी, असं न्यायालयाला सांगितलं. यावर न्यायालयानं तुम्ही शेवटच्या दिवशी आला आहात. होळीच्या सुट्टीनंतर सुनावणी होणार आहे, असं स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.