पुद्दुचेरीच्या कराईकल शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.
पुद्दुचेरी : पुद्दुचेरीच्या कराईकल (Puducherry Karaikal) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं एका 42 वर्षीय महिलेनं आपल्या मुलीच्या 13 वर्षीय वर्गमित्राची हत्या केलीय. तिनं मुलीच्या वर्गमित्राला विषमिश्रित शीतपेय दिलं. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, या महिलेनं मुलाची हत्या केली. कारण, तो वर्गात टॉपर होता आणि तिच्या मुलीचा प्रतिस्पर्धी होता. शनिवारी रात्री मुलाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी जे सगयारानी व्हिक्टोरियाला (J Sagayarani Victoria) ताब्यात घेण्यात आलं.
सध्या सर्वच ठिकाणी स्पर्धा आहे. शाळांमध्ये मुलांमध्येही स्पर्धा पाहायला मिळते. मुलांना चांगले गुण मिळावेत यासाठी पालक नेहमी लक्ष देत असतात. पण, स्पर्धेचं एक भयानक प्रकरण पुद्दुचेरी (Puducherry) मध्ये समोर आलं, जिथं एका विद्यार्थिनीच्या आईनं मुलीच्या वर्गमित्राला विष देऊन ठार केलं.
मुलगा नेहमीच शैक्षणिक आणि अभ्यासेत्तर क्रियाकलापांमध्ये अव्वल येत होता. त्यामुळं तिची मुलगी मागे राहते, याचा राग मनात ठेऊन या महिलेनं मुलाचा खून केला. प्राप्त माहितीनुसार, महिलेची मुलगी आणि तिचा वर्गमित्र हे दोघं आठवीत शिकत होते. शुक्रवारी ही महिला मुलांच्या शाळेत गेली होती. तिनं शाळेतील वॉचमनला ती मणिकंदनची आई असल्याचं सांगितलं. महिलेनं शीतपेयांच्या दोन बाटल्या चौकीदाराला दिल्या आणि माझ्या मुलाला द्या, असं सांगितलं.
सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर चौकीदारानं त्या बाटल्या मणिकंदनला दिल्या. हे पेय आईनं पाठवलं आहे, असं समजून मणिकंदन ते पेय प्याला. मात्र, घरी पोहोचल्यावर त्याला उलट्या होऊ लागल्या. यानंतर मुलाच्या पालकांनी त्याला रुग्णालयात नेलं आणि उपचारानंतर त्याला घरी नेण्यात आलं. मात्र, शनिवारी तो पुन्हा आजारी पडला आणि रात्री त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथंच त्याचा मृत्यू झाला.
पण, मृत्यूपूर्वी मणिकंदननं आईला सांगितलं की, तिनं चौकीदाराला दिलेलं शीतपेय प्यायलं. यावर आईला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. त्यानंतर मणिकंदनच्या आईनं संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. मणिकंदनच्या आईनं कराईकल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एसएसपी लोकेश्वरन यांनी (SSP R Lokeswaran) सांगितलं की, तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी महिलेची चौकशी केली आणि शनिवारी रात्री तिला अटक केलीय. चौकशीत महिलेनं सांगितलं की, तिनं शीतपेयात अतिसाराचं औषध मिसळल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून स्थानिक न्यायालयानं महिलेची कारागृहात रवानगी केलीय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.