Pulwama Attack 4th Anniversary : चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता.
या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला आपल्या जवानांनी बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या रूपाने प्रत्युत्तर दिले होते.
2019 मध्ये दिवशी पुलवामा येथील ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना पंतप्रधान मोदींनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. देशभरातून तसेच सोशल मीडीयावर देखील पुववामा हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वीरांना श्रद्धांजली वाहीली जात आहे.
तसेच आज, सीआरपीएफच्या लेथपोरा कॅम्पमध्ये असलेल्या हुतात्मा स्मारकावर 40 शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यासाठी सीआरपीएफ जम्मू-काश्मीरचे स्पेशल डीजी दलजीत सिंह चौधरी देखील उपस्थित राहाणार आहेत.
येथे रक्तदान शिबिरासह विशेष शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. या हल्ल्याला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त लेथपोरा येथे 40 शहीद सीआरपीएफ जवानांच्या स्मरणार्थ स्मारक स्थळाचे उद्घाटन करण्यात आले होते.
हे स्मारक सीआरपीएफच्या 185 बटालियन कॅम्पमध्ये आहे. येथे जैशचा दहशतवादी आदिल अहमद दार याने स्फोटकांनी भरलेली कार सुरक्षा दलाच्या ताफ्यावर धडकवली होती. त्या सर्व 40 सैनिकांची नावे त्यांच्या छायाचित्रांसह स्मारकावर कोरलेली आहेत.
या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या शहीद जवानांचा बदला घेतला. या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. भारतीय लष्कराच्या लढाऊ विमानाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हा हल्ला केला होता.
या सर्जीकल स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांचे दोन तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याबाबत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याबद्दल बोलले होते.
पण भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय सीमेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानला या प्रकरणी पाठिंबा मिळाला नाही. एफ-16 विमानांच्या वापरावरून अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.