Road Accident : कर्नाटक राज्योत्सव मिरवणुकीनंतर घरी परतताना काळाचा घाला; तीन अपघातांत 2 ठार, 9 जण जखमी

कणबर्गीजवळ ब्रेक फेल झाल्याने गाडी एका बाजूला कलंडली.
Pune Bangalore Highway Road Accident
Pune Bangalore Highway Road Accidentesakal
Updated on
Summary

मोटारीचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाल्याची घटना कणबर्गी येथील तलावाजवळ घडली.

बेळगाव : गेल्या चोवीस तासांत ३ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघे ठार आणि ९ जण जखमी झाले. यापैकी ७ जणांची प्रकृती स्थिर असून, उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्योत्सव मिरवणुकीत (Karnataka Rajyotsava) किरकोळ कारणावरून हाणामारीही झाली. या प्रकरणांत दोघांवर गुन्हा दाखल असून, फिर्यादी जखमी आहे.

Pune Bangalore Highway Road Accident
Satish Jarkiholi : 'या' 12 ग्रामपंचायतींचा महापालिकेत होणार समावेश; पालकमंत्री जारकीहोळींचा पुनरुच्चार

एमके हुबळीजवळ दोघांचा मृत्यू

दुचाकी धडकेत दोघे पादचारी ठार झाल्याची घटना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (Pune-Bangalore Highway) एम. के. हुबळीजवळ बुधवारी (ता.१) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. लबैक हलसिगर (वय १८, बागेवाडी), विश्‍वनाथ गुजनाळ (वय २२, रा. बाळेकुंद्री) अशी त्यांची नावे आहेत.

बेळगाव येथील राज्योत्सव मिरवणुकीनंतर ते घरी परत जात होते. एमके हुबळी येथील एका ढाब्यातून जेवण घेऊन रस्ता ओलांडत असताना दुचाकीने त्यांना धडक दिली. यात दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला; तर दुसऱ्याचा वैद्यकीय उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दुचाकीच्या मागील सीटवरील एकजण जखमी आहे. या घटनेची कित्तूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Pune Bangalore Highway Road Accident
कर्नाटक पोलिसांची मुजोरी सुरूच! संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या म्हणून म. ए. समितीच्या 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोटारीचा ब्रेक फेल झाल्याने कणबर्गीत ७ जण जखमी

मोटारीचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात ७ जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. २) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कणबर्गी येथील तलावाजवळ घडली. जखमींपैकी दोघांना जादा दुखापत झाली असून, उर्वरित ५ जणांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले आहे. गोकाक तालुक्यातील उरबेनट्टी येथील लोक राज्योत्सव मिरवणूक पाहण्यासाठी बुधवारी बेळगावला आले होते.

दिवसभर मिरवणुकीत भाग घेऊन रात्री बाराच्या सुमारास कणबर्गीमार्गे गोकाककडे जात असताना हा अपघात झाला. कणबर्गीजवळ ब्रेक फेल झाल्याने गाडी एका बाजूला कलंडली. गाडीमध्ये अकरा प्रवासी होते; त्यापैकी सात जखमी झाले. आनंद हडगीनाळ, राघवेंद्र पाटील, नागराज पाटील, सुदीप लकप्पागोळ (सर्व रा. उरबेनट्टी) आदींसह अन्य जखमी झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बेळगाव उत्तर रहदारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत वाहन चालकाचा जबाब नोंदविला आहे.

काकतीजवळ अपघात; एक जखमी

काकती येथे अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.१) घडली. राज्योत्सव मिरवणुकीनंतर घरी जाताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो गाडीवरून पडला. त्याला दुखापत झाली. वैद्यकीय उपचारांसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काकती पोलिस ठाण्यात गुरुवारी उशिरापर्यंत नोंद नव्हती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

Pune Bangalore Highway Road Accident
Mahabaleshwar : वेण्णा नदीकाठची बेकायदेशीर बांधकामे सील; कारवाई केल्यामुळं महाबळेश्वरात दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शहरात हाणामारी; दोघांवर गुन्हा

किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एकाला दुखापत बुधवारी (ता.१) झाली. यानुसार दोघांच्या विरोधात खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. राज्योत्सव मिरवणुकीत तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यातून शाब्दीक चकमक उडाली. यामुळे दोघांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. जखमीने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. खडेबाजार पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.