सुवर्ण मंदीरातील घटनेनंतर पुन्हा कपूरथाळा येथे विटंबना; तरुणाला अटक

Nishan Sahib
Nishan Sahib
Updated on

पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर (Amritsar Golden Temple) येथे एका तरुणाने पावित्र्य भंग केल्याने त्याची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्यानंतर काही तासांतच, कपूरथळा (Kapurthala) जिल्ह्यात स्थानिकांनी आणखी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. निजामपूर गावातील रहिवाशांनी पवित्र निशाण साहिबचा (शीख ध्वज) अनादर केल्याचा आरोप या तरुणावर केला आहे.

गुरुद्वाराचे कार्यवाहक अमरजित सिंग यांनी फेसबुकवर लाईव्ह स्ट्रीम केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, जेव्हा ते पहाटे 4 वाजता नितनेम (दैनंदिन प्रार्थना) साठी बाहेर पडले तेव्हा त्यांनी तो तरुण निशान साहिबचा अपमान करत असताना पाहिलं. ते म्हणाले की जेव्हा त्यांनी संशयिताला आव्हान दिले तेव्हा त्याने अंधारात पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळाने त्याला पकडण्यात आले. गुरुद्वाराच्या ग्रंथीने सांगितले की, संशयिताने फक्त एवढेच सांगितले की, त्याला दिल्लीतून पाठवण्यात आले होते आणि त्याच्या एका बहिणीची देखील विटंबना केल्याबद्दल हत्या करण्यात आली होती. दरम्यान कपूरथळाचे एसएसपी एचपीएस खाख यांनी बादशाहपूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती दिली

Nishan Sahib
केरळ : भाजप नेत्यासह दोघांची १२ तासात हत्या; परिसरात कलम १४४ लागू

दरम्यान शनिवारी संध्याकाळी सुवर्ण मंदिरात असाच पावित्र्य भंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. गुरुद्वारामध्ये असलेल्या सोन्याच्या ग्रीलवरुन उडी मारत त्याने किरपाण उचली आणि शिख ग्रंथी पवित्र गुरु ग्रंथ साहिबचे पठण सुरु असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचला मात्र, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) टास्क फोर्सच्या सदस्यांनी त्या व्यक्तीला पकडले. मात्र, त्याला एसजीपीसी कार्यालयात नेत असताना तेथे उपस्थित असलेल्या संतप्त जमावाने त्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

Nishan Sahib
PF खातेदारांसाठी अलर्ट; 'या' तारखेआधी ई-नॉमिनेशन करणे बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.