'ज्याला पंतप्रधानांना सुरक्षा देता आली नाही, तो काय...' अमित शहांची चन्नींवर टीका

Amit Shaha
Amit Shahaesakal
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सध्या सत्तेत असणाऱ्या काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीचा राजकीय फायदा घ्यायच्या प्रयत्नात भाजप पक्ष असला तरीही शेतकरी आंदोलनामुळे रुष्ट असलेली पंजाबी जनता भाजपपासून थोडी दुरावल्याचं चित्र आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप (Bharatiya Janata Party) येनकेन प्रकारे काँग्रेसला शह देण्याच्या विचारात आहे तर दुसरीकडे या सगळ्या राजकीय परिस्थितीचा फायदा आप सारखा नवखा पक्ष घेऊ पाहत आहे. आज पंजाबमधील एका प्रचारसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा (Amit Shah ) यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

Amit Shaha
धक्कादायक! आध्यात्मिक गुरुच्या आदेशावर तीन वर्षे सुरु होता शेअर बाजार

त्यांनी म्हटलंय की, ज्या व्यक्तीला पंतप्रधान मोदी (Narendra Modi) जात असलेला रोड सुरक्षित ठेवता आला नाही, त्या व्यक्तीच्या हातात पंजाबसारखं राज्य काय सुरक्षित राहणार आहे?

चन्नीसाहेब हे पंजाबमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहत आहेत. मात्र, एक असा मुख्यमंत्री ज्याला पंतप्रधानांचा रस्ता सुरक्षित ठेवता आला नाही तो पंजाब काय सुरक्षित ठेऊ शकणारे? लुधियानामधील प्रचारसभेत अमित शहा यांनी हे वक्तव्य केलंय.

Amit Shaha
इस्रो उद्या लॉंच करणार PSLV-C52; प्रक्षेपण Live कसे पाहावे? वाचा

नेमकं काय घडलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फिरोजपूर दौरा सुरक्षेतील मोठ्या त्रुटींमुळे रद्द करण्यात आला होता. गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं होतं की, काही आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळं पंतप्रधान 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. (PM Modi Security Breach) या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता. एवढेच नाही तर भाजपने सत्ताधारी काँग्रेस सरकारवर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात घोळ आणि सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचा आरोप केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()