यूपी, बिहारी भय्यांना राज्यात घुसू देऊ नका; CM चन्नींच्या विधानामुळे वाद

Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniSakal
Updated on

चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजितसिंग चन्नी यांनी उत्तरप्रदेश आणि बिहारींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. चंडीगड येथील सभेत बोलताना चन्नी यांनी उत्तरप्रदेश, बिहार आणि दिल्लीतील भय्यांना पंजाबमध्ये घुसू द्यायचे नाही, या मंडळींना येथे राज्य करू द्यायचे नाही त्यासाठी सर्व पंजाबी नागरिकांनी एकजूट होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. विशेष या म्हणजे या सभेला काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या देखील उपस्थित होत्या, चन्नी (Charanjit Singh Channi) हे विधान करत असताना प्रियांका या व्यासपीठावर बसून हसत होत्या असा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेसने उत्तरप्रदेश आणि बिहारमधील (UP Bihar) जनतेचा अवमान केला असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. (Punjab Assembly Election 2022)

Charanjit Singh Channi
ईडीच्या चौकशीला घाबरुन राणे भाजपला शरण; विनायक राऊत बरसले

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी चन्नी यांचा व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की,‘‘ पंजाबचे मुख्यमंत्री यूपी, बिहारमधील नागरिकांचा जाहीर अवमान करत असताना प्रियांका गांधी- वद्रा या त्यांच्या शेजारी बसून हसतात आणि टाळ्या देखील वाजवतात. काँग्रेस अशापद्धतीने देशाचा आणि राज्याचा विकास करणार आहे? लोकांना आपआपसांत लढविणार आहे का?’’

चन्नी यांचे वक्तव्य अत्यंत लाजीरवाणे असून आम्ही कोणताही समुदाय अथवा व्यक्तीविरोधातील वक्तव्यांचा निषेध करतो. प्रियांका गांधी यांचाही उत्तरप्रदेशशी संबंध असून त्यामुळेच त्यादेखील भय्या झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

Charanjit Singh Channi
"बँकेचे पैसे बुडवून पळालेले सगळे लोक गुजरातचेच का आहेत?"

काँग्रेसच्या अडचणी वाढणार

चन्नी यांचे हे वक्तव्य काँग्रेसला अडचणीत आणू शकते अशी भीती राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. लुधियाना, जालंधर, पठाणकोट आणि मोहाली या भागांमध्ये परप्रांतीयांचे वर्चस्व असून तेथे काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. आम आदमी पक्ष (आप) आता हाच मुद्दा तापवित असून या मतदारांना स्वतःकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहे. चन्नी यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या हातीही आयतेच कोलीत लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()