रिमोटने कंट्रोल न करता आल्यानं अमरिंदर सिंगांना हटवलं: PMमोदी

रिमोटने कंट्रोल न करता आल्यानं अमरिंदर सिंगांना हटवलं: PMमोदी
Updated on

जालंधर : "पंजाबमध्ये काँग्रेसने कॅ. अमरिंदरसिंग यांचा अवमान केला, दिल्लीत बसलेल्यांनी वारंवार त्यांच्या सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला. रिमोट कंट्रोलच्या आधारे ते पंजाबमधील सरकार चालविण्याचा प्रयत्न करत होते." असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज येथे आयोजित जाहीरसभेत बोलताना केला. (Punjab Assembly Election 2022)

रिमोटने कंट्रोल न करता आल्यानं अमरिंदर सिंगांना हटवलं: PMमोदी
कुठे गेले 15 लाख आणि दोन कोटी रोजगार? राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या वक्तव्याचा दाखला देताना मोदी म्हणाले की, "कॅप्टन यांचे सरकार दिल्लीतून चालावे अशी आमची इच्छा नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत, त्यावरून काँग्रेसची सरकारे राज्यघटनेनुसार नाही तर एका कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलनुसार चालतात हे दिसून येते. याचाच अर्थ काँग्रेसचा संघराज्य व्यवस्थेवर विश्वास नसल्याचे दिसून येते. कॅप्टन हे काँग्रेस हायकमांडचे (Congress) नाही तर केंद्र सरकारचे जास्त ऐकतात असा दावा त्यांच्या पक्षाचे नेते करत होते. याच मंडळींचा पंजाब सरकारमधील (Punjab Government) हस्तक्षेप वाढला होता शेवटी त्यांनीच कॅप्टन यांना बाजूला केले. काँग्रेस आता त्यांच्याच कृत्याची शिक्षा भोगत आहे. राज्यातील काँग्रेसची स्थिती पाहा, त्यांचीच नेते मंडळी स्वपक्षातील नेत्यांचा भंडाफोड करताना दिसतात. अशा प्रकारच्या अंतर्गत संघर्षात अडकलेला पक्ष पंजाबला स्थिर सरकार देऊ शकेल काय?" (Punjab Assembly Election 2022)

रिमोटने कंट्रोल न करता आल्यानं अमरिंदर सिंगांना हटवलं: PMमोदी
"विरोधकांचे सर्व धंदे उद्यानंतर बंद होतील"; संजय राऊतांचा इशारा

पोलिसांवर टीका

पंजाब दौऱ्यामध्ये शक्तिपीठ असणाऱ्या त्रिपुरमालिनी देवीचे दर्शन घ्यायची माझी इच्छा होती पण ऐनवेळी स्थानिक पोलिसांनी हात वर केल्याने मला दर्शनाला जाता आले नाही. तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही हेलिकॉप्टरने जा असे मला सांगण्यात आले. ही येथील स्थिती असल्याचा टोला मोदींनी लगावला. पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर नक्कीच देवीचे दर्शन घेईन असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

पहिलीच सभा

पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते पक्षाच्या नव्या प्रचार मोहिमेची सुरूवात करण्यात आली. ‘नवा पंजाब, बीजेपी दे नाल, नवा पंजाब, नयी टीम दे नाल’ अशी टॅगलाइन पक्षाकडून जारी करण्यात आली. पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटीमुळे मध्यंतरी पंतप्रधान मोदींना त्यांचा दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले होते, त्यानंतर आज प्रथमच मोदींची जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.