पतियाळा: पतियाळा (Patiala)जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत (Punjab Assembly Election) आठपैकी तब्बल सात जागा जिंकलेल्या काँग्रेसची (Congress) या निवडणुकीत दमछाक होत आहे. या जिल्ह्यात काँग्रेसचे सात विद्यमान आमदार आहेत, पण त्या जागाही राखण्याचे आव्हान पक्षांसमोर असेल.
याच जिल्हयातील कॅप्टन अमरिंदरसिंग हे (Amarinder Singh) पूर्वी काँग्रेसमध्ये होते. गेल्या निवडणुकीत ते पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते, या जोरावर काँग्रेसने बाजी मारली असली तरी यावेळी कॅप्टनच काँग्रेसला सोडून गेले आहेत. त्यांनी स्वतंत्र पंजाब लोकल काँग्रेसची स्थापना केली असून, या पक्षाची आघाडी भारतीय जनता पक्षासोबत आहे. या आघाडीत माजी खासदार डिन्सा यांच्या नेतृत्वाखालील अकाली दिल आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग स्वतः पतियाळा शहर मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांनी याच मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत तब्बल ३४ हजार मतांनी विजय मिळवला होता.
कॅप्टन अमरिंदर सिंग स्वतः पतियाळा शहर मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांनी याच मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत तब्बल ३४ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात आपचे बलबर सिंग उमेदवार होते. गेल्या निवडणुकीतील त्यांचे मताधिक्य पाहता यावेळीही त्यांची बाजू भक्कम दिसते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने पतियाळा महापालिकेचे माजी महापौर विष्णू शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. शर्मा नवखे आहेत. त्यांनी महापालिकेशिवाय दुसरी निवडणूक लढवलेली नाही, पण कामाचा माणूस अशी त्यांची या मतदारसंघात ओळख आहे.
गेल्या निवडणुकीत तब्बल सात जागा या जिल्ह्यातून काँग्रेसने जिंकल्या होत्या, तर एक जागा अकाली दलाने जिंकली होती. आप किंवा भाजपला गेल्या निवडणुकीत या जिल्ह्यातून एकही जागा मिळालेली नव्हती; पण यावेळी या जिल्ह्यातही मुख्य लढत ही काँग्रेस विरुद्घ आप अशीच असल्याचे लोकांकडून सांगण्यात आले. भाजप-पंजाब लोकल काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे वर्चस्व फारस नसल्याचे काहींनी सांगितले. जाहीर प्रचाराला बंदी असल्याने घरोघरो भेटी देण्यावर सर्वच उमेदवारांचा भर आहे. आपच्या प्रचारासाठी तर संपूर्ण शहरभर पक्षाचे चिन्ह आणि दिल्लीचे मुख्यमत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांचा फोटो असलेला ध्वज घेऊन अनेक कार्यकर्ते दिवसभर रस्त्यावरच उभा असल्याचे दिसते. आपण ही सेवा म्हणून हे काम करत असल्याचे यापैकीच एक असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
विद्यमान काँग्रेस आमदारांचे मतदारसंघ
पतियाळा शहर, नव्बा, राजपुरा, घनोर, समाना, छत्राना, भुसूर
आप-काँग्रेसमध्येच लढत
काँग्रेस सोडून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी स्वतंत्र पक्ष काढून भाजपशी आघाडी केली असली तरी पतियाळा जिल्ह्यात खरी लढत ही आप व काँग्रेसमध्येच आहे, त्यात काँग्रेस बाजी मारेल.
पवन कुनार, काँग्रेस नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.