होशियारपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा रोजगार आणि काळ्या पैशाच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. मोदी हे याआधी त्यांच्या भाषणामध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा करत असत. दोन कोटी रोजगार देऊ असे सांगत असत. यापैकी एक तरी जनतेला मिळाले आहे का? आता ते भ्रष्टाचार आणि रोजगाराबाबत का बोलत नाहीत? मोदींनी (PM Modi) नोटाबंदी केली, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केला, याचा नेमका कोणाला फायदा झाला? असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज येथील प्रचारसभेत बोलताना केला. (Punjab Assembly Election 2022)
राहुल म्हणाले,
- शेतकऱ्यांनी थंडीमध्ये उपाशी राहून आंदोलन केले
- शेतकऱ्यांचे मेहनतीचे पैसे केंद्राकडून उद्योगपतींच्या घशात
- मोदींनी दोन मिनिटेही शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली नाही
- आंदोलनादरम्यान मरण पावलेल्यांना केंद्राकडून भरपाई नाही
- राजस्थान, पंजाब सरकार आंदोलकांच्या पाठीशी उभे राहिले
पंजाबचे मुख्यमंत्री अडकले
पंतप्रधान मोदींचा (PM Modi) पंजाब दौरा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना आज होशियारपूरमध्ये आयोजित सभेत सहभागी होता आले नाही. मोदींच्या दौऱ्यामुळे पंजाबमध्ये नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले असून त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणास परवानगी देण्यात आली नाही. चन्नी यांना हवाईमार्गे चंडीगडहून होशियारपूरला जायचे होते पण त्यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणास परवानगी मिळू शकली नाही. या मुद्यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केला आहे. (Punjab Assembly Election 2022)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.