'गोवा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती आखणार'

Prashant Kishore
Prashant Kishoreesakal
Updated on
Summary

सध्या पंजाबात (Punjab) आतापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागलेय.

चंदीगड : सध्या पंजाबात (Punjab) आतापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागलेय. मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) हे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराची तयारी करण्यास मदत करतील, असे संकेत दिलेत. चन्नी यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पक्षाचे आमदार आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) प्रभारी हरीश चौधरी (Harish Chaudhary) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे आणि यात मुख्यमंत्री चन्नी आपल्या सहकार्यांसोबत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रभारी हरीश चौधरीही या व्हिडिओत प्रशांत किशोर यांच्याकडे काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सोपवण्याचा सल्ला देत आहेत. याला इतर नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळताना दिसतोय. त्यामुळं पंजाब विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर काँग्रेसच्या प्रचाराची कमान सांभाळण्याची शक्यता आहे.

Prashant Kishore
योगींना रोखण्यासाठी अखिलेशनं उपसलं युतीचं अस्त्र

या वर्षाच्या सुरुवातीला प्रशांत किशोर यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी बोलून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सध्या किशोर हे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसला (TMC) मदत करत आहेत. यापूर्वी किशोर यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अमरिंदर सिंग यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. पंजाबात 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस प्रचंड बहुमतानं सत्तेवर आली. गेल्या महिन्यात काँग्रेसनं अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून चन्नी यांना मुख्यमंत्री बनवलंय.

Prashant Kishore
भारताच्या श्रीनगर-शारजाह विमान उड्डाणावर 'पाक'चा आक्षेप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()