दुचाकीवरून दोन तरुण घराबाहेर आले... बेल वाजवली अन् भाजप नेत्याच्या तोंडावर गोळी झाडली

Punjab BJP Balwinder Gill shot at by unidentified persons in Amritsar Jandiala Guru area
Punjab BJP Balwinder Gill shot at by unidentified persons in Amritsar Jandiala Guru area
Updated on

भाजप नेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील जंडियाला विधानसभा क्षेत्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बलविंदर सिंह गिल असं या भाजप नेत्याचं नाव आहे. (Punjab BJP Balwinder Gill shot at by unidentified persons in Amritsar Jandiala Guru area )

झालेल्या या हल्ल्यामध्ये बलविंदर सिंह हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. बलविंदर सिंह हे अमृतसर जिल्ह्यातील जंडियाला विधानसभा क्षेत्रातील रहिवासी आहेत. सध्या त्यांच्यावर अमृतसरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बलविंदर सिंग गिल त्यांच्या घरी होते. यादरम्यान दुचाकीवरून दोन तरुण त्यांच्या घराबाहेर आले. आरोपीने घराबाहेर बेल वाजवली आणि भाजप नेते बलविंदर सिंग गिलने दरवाजा उघडताच एका तरुणाने त्याच्या तोंडावर गोळी झाडली. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी त्याच्या जबड्यातून गेली आहे. त्याचवेळी घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले.

भाजप नेत्याला प्रथम जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजद्वारे तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमृतसरमध्ये तैनात असलेल्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली होती. सहाय्यक उपनिरीक्षक भूपिंदर सिंग याने पत्नी बलजीत कौर आणि मुलगा लवप्रीत सिंग यांची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. यासोबतच आपल्या पाळीव कुत्र्यालाही मारून एएसआय फरार झाला. दुसरीकडे एएसआयने पत्नी आणि मुलाची हत्या का केली, याचे कारण अद्याप पोलिसांना मिळालेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.