पंजाबमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

पंजाबमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा
Updated on

नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी न होताच त्यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीआधी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची निवासस्थानी बैठक घेतली होती. चंदिगढमधील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत त्यांच्या बाजुने असलेल्या आमदारांनी उपस्थिती लावली होती. तसंच सायंकाळी त्यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळही मागितली होती.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्याचंही समजते. त्यात जर वाद संपला नाही तर मी राजीनामा देईन असंही अमरिंदर सिंग यांनी सांगितल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी अशीही माहिती दिली की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी असेही पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे की, जर मुख्यमंत्रीपदावरून हटवले तर राजीनामा दईन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.