पंजाबचे मुख्यमंत्री करणार पुन्हा एकदा लग्न; कोण आहे नववधू?

आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार
Bhagwant Mann Marriage
Bhagwant Mann Marriagesakal
Updated on

Bhagwant Mann Marriage: आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. भगवंत मान यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून त्यांची पहिली पत्नी आणि मुले अमेरिकेत राहिला गेले आहे. भगवंत मान यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला आली होती. भगवंत मान यांच्या आईची इच्छा होती, त्याने दुसर लग्न कराव. भगवंत मान यांचा विवाह मुख्यमंत्र्यांच्या आई आणि बहिणीने निवडलेल्या मुलीशी म्हणजेच डॉ. गुरप्रीत कौरशी होणार आहे.

भगवंत मान यांच्या लग्नाचे आयोजन चंदीगडमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह काही खास व्यक्तींचाच सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. भगवंत मान हे 48 वर्षांचे असून, ते दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. भगवंत मान यांनी पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला आहे. त्यांना दोन मुले आहेत, जी कौर यांच्यासोबत अमेरिकेत राहतात.

कॉमेडियनमधून राजकारणी झालेले भगवंत मान 2014 मध्ये पहिल्यांदाच संगरूरमधून खासदार झाले. त्यानंतर त्यांची पत्नी इंद्रजीत कौरही त्यांच्या प्रमोशनमध्ये दिसली. मात्र, 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. भगवंत मान यांनी 2019 मध्ये संगरूरमधूनही निवडणूक जिंकली होती. पण 2022 मध्ये ते पंजाबमध्ये 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले.

भगवंत मान यांनी 16 मार्च 2022 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. घटस्फोटानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली होती ज्यात त्यांनी राजकारणासाठी पत्नीपासून वेगळे होत असल्याचे ननुद केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()