चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असून, डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत त्यांचा विवाह पार पडणार आहे. मान यांचा हा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा होणार असून, यासाठी मोजक्याच मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. जरी विवाह सोहळ्याला मोजकेच पाहुणे येणार असले तरी, त्यांच्या पाहुणचारामध्ये मान आणि कौर कुटुंबियांकडून कोणतीही तडजोड करण्यात आलेली नसून सध्या या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाहुणे मंडळींसाठीच्या मेन्युची चर्चा सगळीकडे रंगली आहे.
असा असेल मान आणि कौर यांच्या लग्नाचा मेनू
लग्गात सहभागी होणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी कढई पनीर, मशरूम कांदा, जर्दाळू भरलेला कोफ्ता, कलोंजी बटाटे, चना मसाला, तंदूरी कुलचा, दाल मखनी या भाज्यांचा समावेश असणार आहे. तर, दुसरीकडे मुगाच्या डाळीची खीर, रॉयल पीस, अंगूरी रसमलाई, माहा दी जलेबी, ड्रायफ्रूट रबरी, गरमागरम गुलाब जामुन हे गोड पदार्थ मिळणार आहेत.
कोण आहे गुरप्रीत कौर?
गुरप्रीत कौर या मुळच्या हरियाणाच्या असून, सध्या त्या पंजाबमधील राजपुरा येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी महर्षी मार्कंडेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून एमबीबीएस केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरप्रीत कौर या भगवंत मान यांच्या कुटुंबीयांच्या आधीच संपर्कात होत्या. तसेच त्या मान यांच्या शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित होत्या.
भगवंत मान यांची पहिली पत्नी कोण होती?
भगवंत मान यांचे पहिले लग्न इंद्रप्रीत कौर यांच्यासोबत झाले होते. त्यांच्यापासून मान यांना दोन मुलेही आहेत. मुलगी सीरत कौर मान (वय 21 वर्षे) आणि मुलगा दिलशान सिंग मान (17 वर्षे) सध्या त्यांच्या आईसोबत अमेरिकेत राहतात. असे असतानादेखील दोन्ही मुलांनीही मान यांच्या शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. इंद्रप्रीत कौर आणि भगवंत मान यांनी मार्च 2015 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.