पंजाबचे मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला; राजीनामा देण्याची शक्यता

कॅप्टन अमरिंदर सिंग
कॅप्टन अमरिंदर सिंग
Updated on
Summary

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह राज्यपालांना भेटण्यासाठी गेले असून ते राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद संपवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीने शनिवारी राज्यातील काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह राज्यपालांना भेटण्यासाठी गेले असून ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. यानंतर ते पत्रकार परिषद घेणार असून राजीनाम्याची घोषणा करू शकतात.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पंजाबच्या पर्यवेक्षकांना स्पष्ट सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार राज्यात पक्षातला वाद संपला पाहिजे आणि यात आता उशीर करून चालणार नाही. तसंच आमदारांच्या बैठकीत ज्याच्या बाजुने बहुमत असेल त्याच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल असं समजते. कॅप्टन अमरिंदर यांच्याविरोधात जर बहुमत असेल तर लगेच दुसऱ्या व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात येईल असे समजते.

अमरिंदर सिंग यांच्याविरोधात तयार झालेल्या वातावरणामुळे नाराज झालेले कॅप्टन राज्यपालांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र ते आता राज्यपाल भवनात जाणार की काँग्रेस भवनात यावरच सर्व स्पष्ट होईल. त्याआधी कॅप्टन त्यांच्या गटातील आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. जर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला तर सुनील जाखड, सुखजिंदर रंधावा आणि प्रताप सिंह बाजवा यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.