पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी 'आप'चा चेहरा उद्या होणार जाहीर

Punjab Elections 2022: पंजाबचा मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा उद्या दुपारी १२ वाजता जाहीर केला जाईल अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे
AAP CM Face will announce tomorrow
AAP CM Face will announce tomorrow sakal
Updated on

Punjab Elections 2022: पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला विधानसभा निवडणूका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. खास करून आम आदमी पार्टी (AAP) पूर्ण ताकदीनिशी या निवडणूकीत उतरत आहे. गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्रीपदाचा (CM FACE) चेहरा कोण असणार याविषयी चर्चा रंगत आहेत. पंजाबमध्ये आपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार हे उद्या दुपारी 12 वाजता जाहीर होणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.

AAP CM Face will announce tomorrow
'आप'चं पंजाब मॉडेल कसं असेल? केजरीवालांनी सांगितला अजेंडा

पंजाबमध्ये 117 विधानसभा मतदारसंघांसाठी 14 फेब्रुवारी रोजी निवडणूका होत आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली ही निवडणूक भाजप, काँग्रेस, तसेच पंजाबमधील प्रादेशिक पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीनेदेखील उडी घेतली असून नुकतीच या पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीने एक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर केला होता. ज्यावर पंजाबमधील मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोणता असावा याबद्दलचं मत पंजाबच्या नागरिकांनी नोंदवावं, असं आव्हान आम आदमी पार्टीने केले होते. लोकांनी पसंती दिलेल्या नावाचा विचार केला जाईल असंही आपने हा नंबर जाहीर करताना म्हटलं होतं. 17 जानेवारीला संध्याकाळी 5 पर्यंत नागरिकांना आपलं मत नोंदवता येऊ शकते .दरम्यान आतापर्यंत 15 लाख लोकांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारांबद्दल आपल्या पसंतीची नावे सुचवली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.