नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये सध्या घमासान गोंधळ सुरु आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पदी आणण्यात आलं. ज्यांच्यासोबतच्या वादविवादामुळे अमरिंदर यांनी हे पद सोडलं ते नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आणि त्यानंतर अमरिंदर सिंग आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या शक्यता दाट झालेल्या आहेत.
या दरम्यानच आता हरीश रावत यांनी कॅप्टन अमरिंदर सिंगांवर निशाणा साधला आहे. रावत यांनी म्हटलंय की, अलिकडेच कॅप्टन अमरिंदर सिंगांनी जी वक्तव्ये केली आहेत, ती पाहता ते कोणत्यातरी दबावाखाली असल्याचं दिसतात. पुढे रावत यांनी म्हटलंय की, कॅप्टन यांनी शेतकरी विरोधी भाजपचा मदतनीस होऊ नये. ही वेळ सोनिया गांधींसमवेत उभं राहण्याची आहे. रावत यांनी असंही स्पष्ट केलंय की, कॅप्टन अमरिंदर सिंगांचा पंजाब काँग्रेसद्वारे अपमान केला गेला असल्याची माहिती चुकीची आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच पक्ष नेतृत्वाने सातत्याने आठवण करुन देऊनही कॅप्टन अमरिंदर यांनी बरगाडी, ड्रग्ज, वीज इत्यादी महत्त्वाच्या मुद्यांवरील आपली आश्वासने पूर्ण करण्यामध्ये अयशस्वी ठरले. कमीतकमी पाचवेळा मी कॅप्टन यांच्यासोबत या मुद्यांवर चर्चा केली मात्र, काही फायदा झाला नाही.
काँग्रेसने जे केलं ते कॅप्टन यांच्यासाठी केलं
रावत यांनी पुढे म्हटलं की, आमदारांची बैठक जाणीवपूर्वक बोलावण्यात आली होती. कॅप्टन यांनी म्हटलं की ते बैठकीला उपस्थित राहणार नाही. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत जे काही केलंय ते अमरिंद सिंगांच्या सन्मानासाठी तसेच 2022 च्या विधानसभा निवडणुकीमधील विजयासाठी केलं आहे. रावत यांनी पुढे असंही म्हटलंय की, अशी एक सामान्य धारणा होती की, कॅप्टन आणि बादल एकमेकांची मदत करत आहेत तसेच त्यांच्या दरम्यान एक छुपा समझौता झाला आहे. अनेक मंत्री याबाबत तक्रार करण्यासाठी दिल्लीला आले होते, की कॅप्टन यांच्या नेतृत्वात काँग्रेस विजयी होऊ शकत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.