पगडी घातल्यानं कुणी सरदार होत नाही; प्रियांका गांधींचा टोला

पगडी घातल्यानं कुणी सरदार होत नाही; प्रियांका गांधींचा टोला
ANI
Updated on

अमृतसर : पगडी घालून कोणी सरदार होऊ शकत नाही. पंजाबमध्ये पंजाबी लोकच राज्य करतील. कोणतेही नवीन मॉडेल या ठिकाणी चालणार नाही. ना मोदींचे ना केजरीवालांचे. मॉडेल फक्त कॉंग्रेसचे आणि पंजाबी लोकांचेच चालेल, असे कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या. (Punjab Assembly Election 2022)

पगडी घातल्यानं कुणी सरदार होत नाही; प्रियांका गांधींचा टोला
भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच राहील; सोमय्यांचा राऊतांवर पलटवार

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आज कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रुपनगर येथे रोड शो केला. त्यांनी ट्रॅक्टरवर बसून रोड शो केला. यावेळी त्यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी होते. त्यानंतर त्या अमृतसरला रवाना झाल्या. तेथे त्या पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रचार करत आहेत. तसेच अमृतसर पश्‍चिम भागात बटाला रोड भागात देखील जाणार असून तेथे रोड शो आणि डोअर टू डोअर प्रचार करणार आहेत. यादरम्यान त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पगडी घातल्याने कोणी सरदार होऊ शकत नाही. आपल्यासमोर भाजप (BJP) आणि आम आदमी (AAP) पक्षाचे नेते आहेत. दोघेही एकच खेळ खेळतात. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांना पाहा. त्या दोघांची सुरवात कोठून सुरवात झाली. या दोघांची सुरवात संघापासूनच झाली आहे. यापैकी एक जण गुजरात मॉडेलची गोष्ट मांडतात, तर दुसरे दिल्ली मॉडेलची.

पगडी घातल्यानं कुणी सरदार होत नाही; प्रियांका गांधींचा टोला
मराठीच्या अभिजात दर्जासाठी राष्ट्रपतींकडे याचिका पाठवणार - सुभाष देसाई

परंतु आपण गुजरात मॉडेल पाहिले. कोणालाही नोकरी मिळाली नाही आणि व्यवसायही चालला नाही. कोणालाही मदतीचा हात मिळाला नाही. दिल्ली मॉडेलनुसार राज्यात नवीन रुग्णालय आणि शिक्षण संस्था देखील उभारली गेली नाही. भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, की व्यासपीठावर पगडी घातल्याने कोणी सरदार होऊ शक नाही. तुम्हीच सांगा खरा सरदार कोण आहे. या पगडीमागची मेहनत आणि धाडस सांगा. पंजाब पंजाबी लोकांचे असून ते त्यांना सांगा, असे आवाहन प्रियांका गांधींनी केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी प्रियांका गांधी या प्रचारासाठी पंजाबमध्ये आल्या होत्या. त्यांनी कोटकपूरा, धुरी, डेराबस्सी येथे सभा घेतली आणि रोड शो घेऊन जनतेशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.