पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका (Punjab Election) जवळ आल्याने नेत्यांच्या भाषणबाजीमुळे वातावरण तापू लागले आहे. शनिवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे संस्थापक कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी चरणजीत सिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू आणि भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला. चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi), नवज्योत सिंग सिद्धू आणि भगवंत मान हे पंजाबसाठी निरुपयोगी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शनिवारी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कॅप्टन अमरिंदर म्हणाले, पंजाबची जनता काँग्रेसला धडा शिकवेल. आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भगवंत मान (bhagwant mann) हा विनोदी अभिनेता आहे आणि पंजाबच्या लोकांना कॉमेडी नाही तर गंभीरता हवी आहे. आम आदमी पार्टीचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांच्याकडे पंजाबचे (Punjab Election) कोणतेही मॉडेल नाही, ते फक्त हवेत बोलत आहेत. चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे दोघेही पंजाबसाठी निरुपयोगी आहेत. काँग्रेसमधील लढाई त्यांना निवडणुकीत धडा शिकवेल, असेही कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) म्हणाले.
एक दिवसापूर्वी टीव्ही मुलाखतीत नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी काँग्रेसच्या सीएम चेहऱ्याबद्दल सांगितले होते की पंजाबमध्ये काँग्रेसला फक्त काँग्रेसच पराभूत करू शकते. येथे आम्ही सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवत आहोत. पंजाब काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते राज्याचे पहिले मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना पाठिंबा देत आहेत, जे अनुसूचित जाती समुदायाचे आहेत. काँग्रेस हायकमांडने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ११७ सदस्यीय विधानसभेच्या निवडणुका ‘सामूहिक नेतृत्वाखाली’ लढवल्याचा दावा केला आहे. परंतु, त्यांच्या राज्य युनिटच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणाची परिस्थिती लवकरात लवकर स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.