नवी दिल्ली : पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं मतदान (Punjab Poll) सुरु आहे. या मतदानाचा कल लक्षात घेता राजकीय समिकरणं बदलू शकतात. पंजाबमधील स्थानिक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल (Shiromani Akali Dal) आणि भाजप (BJP) हे जुने सहकारी आहेत. शेतकरी आंदोलनावरुन यांच्या युतीत फूट पडली. पंजाब विधानसभेसाठी हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत असले तरी ते पुन्हा एकत्र येण्याची चिन्हं आहेत. शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. (Punjab Election will Shiromani Akali Dal BJP alliance said Brikam Majithia)
ब्रिकम सिंग म्हणाले, पंजाबच्या जनतेच्या हक्कांसाठी आमचा लढा सुरु आहे. अमृतसर पूर्वमध्ये विकास गरजेचा आहे. या ठिकाणच्या गरीब जनतेपर्यंत कल्याणकारी योजना अद्याप पोहोचलेल्या नाहीत. हा भाग सर्वाधिक मागास आहे. पण सत्याचाच विजय होईल. पंजाबच्या निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करायची की नाही हे निश्चित होईल.
मजिठिया यांनी दोन जागांवरुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमृतसर ईस्टमधून ते काँग्रेसचे उमेदवार नवज्योतसिंग सिद्धू यांना टक्कर देणार आहेत. त्याचबरोबर मजेठिया मतदारसंघातूनही त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेसवरही मजेठिया यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, घमेंडी राजकारणाचा शेवट होणार आहे. लोकांनी काँग्रेसला पाच वर्षे सत्ता देऊन पाहिलं पण त्यांनी काहीही केलं नाही. अकाली दलाचे नेते गुरबचन सिंग यांनी संकेत दिले की, पक्षाच्या जागा कमी झाल्या तर भाजपसोबत युतीबाबत विचार केला जाईल. गुरबचन सिंग हे गुरुदासपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.