Rail Roko : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा ‘रेल रोको’

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या गव्हाच्या मूल्यकपातीच्या केंद्राच्या घोषणेच्या निषेधार्थ पंजाबमध्ये अनेक ठिकाणी आज ‘रेल रोको’ केला.
Rail Roko
Rail Rokosakal
Updated on
Summary

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या गव्हाच्या मूल्यकपातीच्या केंद्राच्या घोषणेच्या निषेधार्थ पंजाबमध्ये अनेक ठिकाणी आज ‘रेल रोको’ केला.

चंडीगड - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या गव्हाच्या मूल्यकपातीच्या केंद्राच्या घोषणेच्या निषेधार्थ पंजाबमध्ये अनेक ठिकाणी आज ‘रेल रोको’ केला. रूळावर मोठ्या प्रमाणात शेतकरी बसल्याचा अनेक रेल्वेंना फटका बसला तसेच प्रवाशांचीही गैरसोय झाली. केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध तीव्र निदर्शने केल्यानंतर शेतकरी आता गव्हाच्या मूल्यकपातीवरुन पुन्हा एकदा एकवटले आहेत.

भारती किसान युनियन (एकता उग्रहण) आणि बीकेयू (लखोवाल) या शेतकरी संघटनांसह अनेक संघटनांनी आज दुपारी बारा ते चार दरम्यान रेल रोको करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, पंजाबमधील लुधियाना, अमृतसर, भटिंडा, फिरोजपूर, संगरूर, गुरुदासपूर आणि तरणतारण आदी शहरांमध्ये शेतकऱ्यांनी लोहमार्गावर बसत रेल रोको केला. एवढेच नव्हे, तर काही शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावरच तंबू ठोकले.

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी तसेच विक्री रोखण्यासाठी पंजाबसह, चंडीगड, हरियाना आणि राजस्थानात गहू खरेदीसाठी गुणवत्ता निकष शिथिल केले आहेत, अशी माहिती गेल्या आठवड्यात एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. त्याचप्रमाणे, सरकारने अवकाळी पावसामुळे शेतातच आडव्या झालेल्या व वाळलेल्या पिकांची सध्याची सहा टक्क्यांची मर्यादा अठरा टक्क्यांपर्यंत शिथिल केली होती. सुमारे दहा टक्क्यांपर्यंत चमक कमी झालेल्या गव्हाची मूल्यकपात मात्र करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे, दहा ते ऐंशी टक्क्यांपर्यंत चमक कमी झालेल्या गव्हावर प्रतिक्विंटल साडेपाच रुपये कपात करण्यात आली आहे. या मूल्यकपातीचा भार पंजाब सरकार उचलेल, असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.