पंजाब सरकारने काढली 184 VIP लोकांची सुरक्षा

सुरक्षा काढून घेतलेल्या लोकांमध्ये मंत्री, आमदार आणि काही खासगी लोकांचा सामावेश आहे.
Bhagvant Man
Bhagvant ManSakal
Updated on

चंदीगढ : पंजाबचे नवे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते भगवंत सिंग माण यांच्या सरकारने राज्यातील १८४ लोकांना पुरवलेली सुरक्षा काढून घेतली आहे. सुरक्षा काढून घेतलेल्या लोकांमध्ये मंत्री, आमदार आणि काही खासगी लोकांचा सामावेश आहे. त्यांना सरकारची सुरक्षा पुरवण्यात आलेली होती.

मंत्री, आमदार आणि खासगी व्यक्तींना दिलेली सुरक्षा काढण्याचे आदेश २० एप्रिलला दिले होते. त्यांच्या सुरक्षेचा काळ संपल्यामुळे ही सुरक्षा काढण्यात येत असल्याची माहिती पोलिस सुरक्षा महासंचालकांनी सांगितलं.

Bhagvant Man
पाकिस्तानात शिक्षण घेतलेल्यांना भारतात नोकरी नाही; UGC & AICTEचे आदेश

सुरक्षा काढून घेण्यात आलेल्या 184 व्हीआयपी लोकांपैकी माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी गुरुदर्शन ब्रार, आयपीएस गुरुदर्शन सिंग आणि उदयबीर सिंग (माजी मंत्री सुखजिंदर सिंग यांचा मुलगा) यांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी कॅबिनेट मंत्री सुरजितसिंग राखरा, बिबी जागीर कौर, तोता सिंग, कॉंग्रेसचे माजी खासदार विरेंदर सिंग बाजवा, संतोष चौधरी आणि कॉंग्रेसचे माजी आमदार दीप मल्होत्रा यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजेश बग्गा, भाजपाचे स्टार प्रचारक माही गिल आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिंगर सिंग कोहली यांचीसुद्धा सुरक्षा काढण्यात आली आहे.

Bhagvant Man
मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

ज्या ठिकाणी कर्मचारी तैनात आहेत त्या ठिकाणची सुरक्षा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत काढण्यात येणार नाही. दरम्यान १२ मार्च रोजी संसदेतील आमदार आणि खासदार मिळून १२२ सदस्यांचा सुरक्षा काळ संपला होता. त्यानंतर ही कारवाई सरकारकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.