oxygen storage in nashik
oxygen storage in nashike-sakal

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यात मृत्यू; पंजाबची केंद्राला माहिती

Published on
Summary

देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली होती. त्यानंतर देशभरातून सरकारवर टीका झाली.

नवी दिल्ली- देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली होती. त्यानंतर देशभरातून सरकारवर टीका झाली. नुकतेच पंजाबने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्राला दिली असल्याची माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलीये. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, 'अमृतसरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये सुरुवातीच्या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.'

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुरुवातीला काही प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. त्यामुळे 6 रुग्णांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झालाय. आपली गरज 300 टन ऑक्सिजनची होती, पण आपण केवळ 70 टन ऑक्सिजन निर्मिती करत होता. पण, आपण सध्या 400 टन ऑक्सिजनची निर्मिती करत आहोत. त्यामध्ये सध्या कसलाही तुटवडा नसून परिस्थिती आटोक्यात असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झालाय का? याबाबत सर्व राज्यांना माहिती देण्यास सांगण्यात आले होते. रिपोर्टनुसार, आतापर्यंत एका राज्याने आम्हाला ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याचे कळवले आहे. याशिवाय इतर राज्यांनी पाठवलेल्या माहितीमध्ये कोणत्याही राज्याने ऑक्सिजनसंबंधी मृत्यू झाल्याचे कळवले नाही, असं लव अग्रवाल म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()