भाजपसोबत युती करताच कॅप्टनचा काँग्रेसला झटका

Punjab Assembly Election
Punjab Assembly Electionesakal
Updated on
Summary

दिल्लीत भाजप आणि पंजाब लोक काँग्रेस यांच्यात युती झाल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय.

दिल्लीत भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) आणि पंजाब लोक काँग्रेस (Punjab Lok Congress) यांच्यात युती झाल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. ही युती होताच पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांच्या पक्षानं काँग्रेसला (Congress Party) जोरदार झटका दिलाय. पटियालामध्ये (Patiala) 22 नगरसेवकांनी काँग्रेसला धक्का देत माजी मुख्यमंत्र्यांच्या नव्या पक्षात प्रवेश केलाय. कॅप्टन अमरिंदर सिंह स्वतः दिल्लीत असताना त्यांची मुलगी बीबा जय इंदर कौर (Biba Jai Inder Kaur) यांनी या नगरसेवकांचं पक्षात स्वागत केलंय. त्यामुळं कॅप्टन विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या जुन्या पक्षाचं मोठं नुकसान करू शकतात, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.

Punjab Assembly Election
बेळगावात आणखी एका पुतळ्याची विटंबना, 27 जणांना अटक

दरम्यान, भाजपनं शुक्रवारी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेससोबत आगामी पंजाब विधानसभा निवडणुका (Punjab Assembly Election) लढवण्याची औपचारिक घोषणा केलीय. घोषणेपूर्वी सिंह यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलीय. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी युतीची औपचारिक घोषणा केली. कॅप्टन यांच्यासह पत्रकारांशी संवाद साधताना शेखावत म्हणाले, भाजप आणि अमरिंदर सिंह पंजाबची निवडणूक एकत्र लढणार आहेत. आम्ही एकत्र काम करणार आहोत. तसेच योग्य वेळी जागा वाटपाबाबत घोषणा केली जाईल, असंही ते म्हणाले.

Punjab Assembly Election
राष्ट्रवादी, सेनेच्या आमदारांसाठी प्रतिष्ठेची लढत

यापूर्वी 14 डिसेंबर रोजी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अनेक माजी काँग्रेस खासदार आणि माजी आमदारांना पक्षाचं सदस्यत्व दिलंय. काँग्रेसचे खासदार अमरिक सिंह अलीवाल, माजी आमदार हरजिंदर सिंह, प्रेम मित्तल, फरजाना आलम आणि राजविंदर कौर यांनी पंजाब लोक काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. याशिवाय, आणखी काही स्थानिक नेत्यांनी पंजाब लोक काँग्रेसचं सदस्यत्व घेतलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()