कौतुकास्पद! चार मुस्लिम कुटुंबांसाठी गावकरी बांधणार मशीद

१९४७ साली फाळणीच्यावेळी या मुस्लिम कुटुंबांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला होता
गुरुद्वारामध्ये जमलेले गावकरी
गुरुद्वारामध्ये जमलेले गावकरी
Updated on

मोहाली: पंजाबच्या (Punjab) मोगा जिल्ह्यातील भुलर (Bhoolar village) गावामध्ये सामाजिक सलोख्याचं एक अनोखं उदहारण समोर आलं आहे. भुलर गावातील गावकऱ्यांनी गावात राहणाऱ्या फक्त चार मुस्लिम कुटुंबांसाठी मशीद बांधण्याचा (built mosque) निर्णय घेतला आहे. १९४७ साली फाळणीच्यावेळी या मुस्लिम कुटुंबांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला होता. भुलर गावामध्ये सात गुरुद्वारा आणि दोन मंदिर आहेत. पण एकही मशीद नाहीय. (Punjab village comes together to build mosque for its four Muslim families)

गावकऱ्यांनी मशीद बांधण्यासाठी १०० रुपयापासून ते १ लाखापर्यंत देणगी देऊन सहकार्य केले आहे. मशिदी बांधणीसाठी पायाभरणीचा कार्यक्रम रविवारी सकाळी झाला. पण मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम नियोजित ठिकाणी होऊ शकला नाही. त्यावेळी गावकऱ्यांनी शेजारच्या गुरुद्वारामध्ये पायाभरणीचा कार्यक्रम केला. गावकऱ्यांनी या कार्यक्रमासाठी गुरुद्वाराचे दरवाजे उघडले व लंगर लावलं होतं.

गुरुद्वारामध्ये जमलेले गावकरी
शिवसेनेने हात जोडून हिंदू समाजाची माफी मागावी - राम कदम

"१९४७ सालच्या फाळणीआधी गावात मशीद होती. आमच्या गावात चार मुस्लिम कुटुंब राहतात. फाळणीच्यावेळी त्यांनी गावातच थांबण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून हिंदू, मुस्लिम आणि शीख कुटुंब गुण्यागोविंदाने, मिळून-मिसळून राहत आहेत" असे भुलर गावचे सरपंच पाला सिंह (४५) यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. "मुस्लिम कुटुंबांसाठी सुद्धा गावातच प्रार्थनास्थळ असलं पाहिजे, अशी गावकऱ्यांची इच्छा होती. त्यामुळे आधी मशीद होती, त्याच जागेवर नव्याने मशीद बांधण्यात येणार आहे" असे पाला सिंह म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.