Pakistan Visa : व्हिसासाठी SEX बाबत विचारले, महिलेच्या आरोपावर पाकिस्तानची प्रतिक्रिया...

pakistan high commission
pakistan high commission
Updated on

पंजाबमधील महिलेने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पंजाब मधील एका महिलेला गेल्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानला जायचे होते. मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या विचित्र मागण्यांमुळे त्या जाऊ शकल्या नाहीत.

पंजाबमधील प्राध्यापक महिलेलने पाकिस्तानला भेट देण्यासाठी व्हिसाच्या बदल्यात लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. 

महिलेने असाही आरोप केला आहे की, लैंगिक संबंधांना नकार दिल्यानंतर उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याने तिच्याशी खलिस्तान आणि भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार कसे होत आहेत, याबद्दल बोलण्यास सुरुवात केली.

pakistan high commission
Jumbo scam in BMC: मुंबई महापालिकेत 6000 कोटींचा जंबो घोटाळा! आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

महिला म्हणाली ती व्हिसासाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या कार्यालयात गेली होती. यावेळी अधिकारी तिच्याशी वयैक्तिक गप्पा करु लागला. यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले.

"माझं लग्न का नाही झांल?, मी लग्नाशिवाय कशी राहू शकते?, माझ्या लैंगिक इच्छेसाठी मी काय करते?", असे प्रश्न पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी विचारल्याचे महिलेने सांगितले. यावेळी खलिस्तानला पाठिंबा देता का?, तसेच काश्मीरमध्ये होणाऱ्या अत्याचारावर लिहू शकता का, असे देखील विचारल्याचे महिलेने सांगितले. 

pakistan high commission
Shirdi Bus Accident : मोठी अपडेट! बस चालक चालवत होता रफ गाडी; सूचना देऊनही...

यावेळी महिलेने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र पाक अधिकार्‍याने तरीही तेच प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला आणि तिला मुस्लिमांच्या काही पंथाबद्दल सांगण्यास सुरुवात केली. जिथे ते काही तासांसाठी ठरावीक उद्देशांसाठी लग्न करू शकतात. मुस्लिम असल्यामुळे त्यांच्यासाठी ४ वेळा लग्न करणे सोपे जाते, असे देखील अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावा महिलेने केला आहे. 

pakistan high commission
Tunisha Sharma Death: शीझान खानला जामीन नाहीच, 'अली' नावानं आणला तुनिषा शर्माच्या केसमध्ये नवा ट्वीस्ट

"आम्हाला एकाचा कंटाळा आला तरी आम्ही दुसरे लग्न करू शकतो. तुमचा धर्म अशी परवानगी देतो का? तुमचा धर्म विवाहबाह्य संबंधांना परवानगी देतो का?", असे देखील पाक अधिकाऱ्याने विचारल्याचे महिलेने सांगितले. 

pakistan high commission
Rakhi Sawant Wedding : लग्नानंतर राखी झाली 'फातिमा', धर्म बदलला!

महिला पुढे म्हणाली की, "पाक अधिकाऱ्याने तिला थेट विचारले, "तुमच्याकडे असे कोणी आहे का ज्याच्याशी तुम्ही लैंगिक संबंध ठेवू शकता की नाही? जोडीदाराशीवाय तुम्ही आरामात कसे जगता?"

pakistan high commission
Air India Case : 'त्या' दिवशी विमानात महिलेनेच सीटवर केली लघुशंका; आरोपीची...

पाकिस्तानची प्रतिक्रिया -

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याने भारतीय महिलेशी केलेल्या कथित असभ्य वर्तनाबद्दल मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना एक विधान केले आहे. 

"व्हिसासाठी येणाऱ्या व्यक्तींशी गैरवर्तन केल्याबद्दल कठोर कारवाईच्या तरतुदी आहेत आणि हे माफ केले जाऊ शकत नाही. जेव्हा आम्ही या प्रकरणाचा शोध घेतला. तेव्हा त्याची वेळ आणि ती ज्या पद्धतीने मांडली गेली आहे ते पाहून आम्हाला धक्का बसला आहे. सर्व सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी आमच्याकडे मजबूत यंत्रणा अस्तित्वात आहे. आमच्या सर्व कर्मचार्‍यांना व्यावसायिक पद्धतीने वागण्याच्या कठोर सूचना देण्यात आल्या आहेत," असे मुमताज जहरा बलोच यांनी म्हटले आहे. 

pakistan high commission
Uorfi Javed : उर्फीचा मोर्चा आता सद्गुरुंकडे; म्हणाली, "छोटी सोच वाले..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.