Sukha Duneke killed : कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर सुखदूल सिंग सुक्खा याची हत्या

punjabs famous gangster sukha duneke killed in inter gang rivalary in Canada Sukhdool Singh news Update
punjabs famous gangster sukha duneke killed in inter gang rivalary in Canada Sukhdool Singh news Update
Updated on

खलिस्तानी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडा आमि भारत यांच्यातील संबंध तणावाचे बनले आहेत. यादरम्यान पंजाबमधील आणखी एका कुख्यात गँगस्टरची कॅनडामध्ये हत्या करण्यात आली आहे. कॅनडा येथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दविंदर बंबीहा गँगमधील सुखदूल सिंग उर्फ सुक्खा याची हत्या करण्यात आली आहे. हरदीप सिंग निज्जर याच्याप्रणाणेच अज्ञातांनी गोळी मारून त्याची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गँग वॉरमधून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.

२०१७ मध्ये सुक्खा हा बनवाट कागदपत्रांच्या मदतीने भारतातून कॅनडामध्ये पळून गेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात भारतात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतात कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक गँगस्टर कॅनडाला पळून गेले आहेत. कॅनडामध्ये खलिस्तान समर्थकांकडून अशा गँगस्टर्सना मिळत असून ते भारतविरोधी अजेंडा चालवत असल्याचा आरोप आहे. यादरम्यान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे आरोप केल्याने दोन्ही देशांमध्ये सध्या टेन्शन वाढलं आहे. यादरम्यान आणखी एका गँगस्टरची हत्या झाली आहे. याबद्दल कॅनडा सरकार काय भूमिका घेते हे पहावे लागणार आहे.

punjabs famous gangster sukha duneke killed in inter gang rivalary in Canada Sukhdool Singh news Update
Canada PM : G20 परिषदेमध्येही सुरू होते कॅनडाच्या पंतप्रधानांचे नखरे; नेमून दिलेल्या रुममध्ये राहण्यास दिला नकार - रिपोर्ट

दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुक्खा दुनेके याला तब्बल १५ गोळ्या मारण्यात आल्या आहेत. कॅनडामध्ये खलिस्तानी निज्जर याच्या हत्येनंतर ही दुसरी मोठी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवार आणि गुरुवार यादरम्यान रात्री विनीपग येथे त्याला गोळ्या घालण्यात आल्या. तसेच पंजाबच्या मोगा गावातील रहिवासी होता. तसेच गुन्हेगारी जगतात सहभागी होण्यापूर्वी त्याने मोगा डीसी कार्यालयात काम देखील केलं आहे. नंगल अंबिया हत्याकांडात देखील सुक्खाचे नाव समोर आले होते.

punjabs famous gangster sukha duneke killed in inter gang rivalary in Canada Sukhdool Singh news Update
India and Canada: कॅनडातील भारतीयांनी काय करावं? काय करु नये?; परराष्ट्र मंत्रालयाची अ‍ॅडव्हायझरी जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.